Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर च्या हत्येप्रकरणी Aaftab Poonawala ची पुढील 5 दिवसांत नार्को टेस्ट करा, थर्ड डिग्री टाळा - न्यायालयाचे आदेश

आतापर्यंत श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणात उघड झालेल्या खुलासामध्ये आफताबने 6 महिन्यांपूर्वी श्रद्धाचा खून केला. तिची ओळख मिटवण्यासाठी चेहरा जाळला. शरीराचे 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले आणि हळूहळू ते जंंगलात फेकले. गांजाच्या नशेत त्याने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे.

Delhi Police arrests Aftab Amin Poonawalla (Photo Credit: ANI)

दिल्लीत लिव इन रिलेशनशीप मध्ये राहणार्‍या श्रद्धा वालकर (Shradha Walkar) ची क्रुर हत्या तिच्याच पार्टनर कडून करण्यात आली आहे. यामध्ये रोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता दिल्ली कोर्टाने Rohini Forensic Science Lab कडे Aaftab Poonawala ची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. येत्या 5 दिवसात आफताबची नार्को टेस्ट करा असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे. मात्र तपासा दरम्यान तपास अधिकार्‍यांनी कोणत्याही थर्ड डिग्रीचा वापर करू नये असेही बजावले आहे. सध्या आफताब 5 दिवसांच्या पोलिस कोठडी मध्ये आहे.

साकेत न्यायालयाच्या महानगर दंडाधिकारी विजयश्री राठोड यांनी आरोपी आफताबच्या नार्को टेस्टसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जाला परवानगी दिली आहे. Legal Aid Counsel Harshit Sagar यांच्यामार्फत आरोपीची संमती लक्षात घेऊन न्यायालयाने याचिका मंजूर केली आहे. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) हजर करण्यात आले होते.

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पोलीस कोठडीत गुरुवारी (17 नोव्हेंबर) दिल्ली न्यायालयाने पुढील पाच दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाने आरोपीच्या नार्को टेस्टच्या अर्जालाही परवानगी दिली. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व्हीसीमार्फत न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला मागील शनिवारी (12 नोव्हेंबर) अटक करण्यात आली आहे. साकेत न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांनी आफताब पूनावालाच्या पोलिस कोठडीत पुढील पाच दिवसांची वाढ केली होती. दिल्ली पोलिसांकडून त्याच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. नक्की वाचा: Shraddha Murder Case: दोन वर्षांपूर्वी Aaftab ने श्रद्धाला केलं होतं रुग्णालयात दाखल; मुंबईतील डॉक्टरांचा खुलासा .

आतापर्यंत श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणात उघड झालेल्या खुलासामध्ये आफताबने 6 महिन्यांपूर्वी श्रद्धाचा खून केला. तिची ओळख मिटवण्यासाठी चेहरा जाळला. शरीराचे 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले आणि हळूहळू ते जंंगलात फेकले. गांजाच्या नशेत त्याने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. मूळचे मुंबईचे असलेले हे जोडपं दिल्ली मध्ये श्रद्धाच्या हत्येपूर्वी अवघे 3 दिवस आधी  पोहचले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now