MJ Akbar’s Defamation Case: Journalist Priya Ramani निर्दोष; माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांना दिल्ली कोर्टाला झटका

अकबर यांच्या विरूद्धच्या आरोपांनंतर त्यांना 17 ऑक्टोबर 2018 साली केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी हा राजीनामा देण्यापूर्वी रमाणी यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. त्यांनी मानहानीचा दावा ठोकला होता.

एम जे अकबर (Photo credit: IANS)

जगभरात ME TOO चळवळीने जोर धरल्यानंतर पत्रकार प्रिया रमाणी (Journalist Priya Ramani) यांच्यासोबत काही महिलांनी माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर (Former Union Minister MJ Akbar) यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या गंभीर आरोपांनंतर केंद्रीय मंत्रीपद गमावलेल्या एम जे अकबर यांना दिल्ली न्यायालयाने देखील झटका दिला आहे. दरम्यान अकबर यांनी बदनामी केल्याचा आरोप करत प्रिया रमाणी यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली होती मात्र आज त्यावर सुनावणी करताना प्रिया रमाणी ला कोर्टाला निर्दोष ठरवलं आहे. 'महिला दशकानंतरही तक्रार करू शकतात तुम्ही केवळ तुमच्या कीर्तीसाठी कोणाच्या प्रतिष्ठेचा बळी देऊ शकत नाही असे न्यायालयाने एम जे अकबर यांना सुनावले आहे. हा निर्णय राउज एवेन्यू कोर्ट ने सुनावला आहे.

दोन्ही पक्षांची आजू ऐकल्यानंतर 1 फेब्रुवारी दिवशी कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान रमाणी यांच्या वकिलांनी त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी त्यांची बाजू Senior Advocate Rebecca John यांनी लढवली होती.  Geeta Luthra यांनी एम जे अकबर यांची बाजू कोर्टात मांडली होती. त्यांनी रमाणीवर मानहानीचा दावा केला होता. #MeToo: 'माझी संमती नव्हतीच, एम. जे. अकबर यांनीच बलात्कार केला'; महिला पत्रकार आरोपावर ठाम.

ANI Tweet

2018 साली रमाणी यांनी एमजे अकबर यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. त्यांच्या आरोपांनुसार, डिसेंबर 1993 साली अकबर यांनी मुंबई मध्ये एका जॉब इंटव्ह्यू साठी बोलावून त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केले होते. अकबर यांच्या विरूद्धच्या आरोपांनंतर त्यांना 17 ऑक्टोबर 2018 साली केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी हा राजीनामा देण्यापूर्वी रमाणी यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. त्यांनी मानहानीचा दावा ठोकला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now