IPL Auction 2025 Live

दिल्ली येथे आधार कार्डच्या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

दिल्ली (Delhi) येथे आधार कार्डच्या (Aadhar Card) माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

aadhar card | (Photo courtesy: Archived, Edited Images)

दिल्ली (Delhi) येथे आधार कार्डच्या (Aadhar Card) माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका तरुणाच्या आधारकार्डवर बनावट फोटो लावून त्याच्या बँक खात्यातून 1 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.

नरेंद्र असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचा मेसेज आला. त्यानंतर लगेच नरेंद्र ह्याने मोबाईल कंपनीला तक्रार केली असता कंपनीने त्याला ड्युअल सिमकार्ड मधील एक मोबाईक क्रमांक बंद करण्यात आला असल्याचे सांगितले. तत्पूर्वी कंपनीने ड्युप्लिकेट सिमकार्ड जारी केल्याचे सांगितले होते. परंतु नरेंद्र ह्याने कोणतेच अन्य कार्ड घेतले नसल्याचे सांगितले. पण कंपनीने त्याला आधारकार्डवरील त्याची माहिती विचारत त्यांच्याजवळ असलेल्या आधारकार्डवरील माहिती तपासून पाहिल्यास सारखीच होती. मात्र त्यावर बनावट फोटो लावल्याने नरेंद्रची फसवणुक झाली आहे.(हेही वाचा-आधार कार्ड पडताळणीसाठी आता भरावा लागणार शुल्क)

तर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट आधार कार्डवरील फोटोमधील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी विरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.