Delhi: 15 ऑगस्ट दिनानिमित्त पोलीस आयुक्तांकडून आदेश जाहीर, लाल किल्ल्यावर लावण्यात येणार अँन्टी ड्रोन स्टिटिम
या बैठकीवेळी अस्थाना यांनी दिल्ली पोलिसांच्या जवळजवळ 50 अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉफ्रेंन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली.
दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी शनिवारी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी अस्थाना यांनी दिल्ली पोलिसांच्या जवळजवळ 50 अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉफ्रेंन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. तेव्हा त्यांनी लाल किल्ल्यावर पार पडणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पार पडणाऱ्या कार्यक्रमासाठी काही महत्वाचे आदेश दिले आहेत.(Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? येथे पहा संपूर्ण यादी)
15ऑगस्ट दिनानिमित्त होणारा कार्यक्रम लक्षात घेता लाल किल्ल्यावर अँन्टी ड्रोन रडार सिस्टिम लावली जाणार आहे. या सिस्टिमची खासियत अशी आहे की, हा ड्रोनवर बारकाईने नजर ठवू शकतो. तसेच त्याला जाम सुद्धा करु शकतो. या अँन्टी ड्रोन सिस्टिमच्या माध्यमातून लाल किल्ल्यापासून दूर 4 किमी पर्यंत जर एखादा संशयित ड्रोन आढळल्यास तर या ड्रोन सिस्टिमच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
नॅनो ड्रोनला ही सिस्टिम दोन किलोमीटर दूरवरुनच ओळखण्यासह जाम सुद्धा करणार आहे. दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर वेळ वाया घालवण्यापेक्षा रस्त्यांवर उपस्थितीत राहून लोकांच्या समस्या आणि कायदे व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे ही निर्देशन दिले आहेत.(प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी तैनात करु शकत नाही, गोव्याच्या मंत्र्यांचे विधान)
तसेच अस्थाना यांनी चार महत्वपूर्ण बिंदूसंदर्भात दिल्ली पोलिसांच्या 50 अधिकाऱ्यांना अधिक माहिती दिली. त्यांनी असे म्हटले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षिततेसाठी लोकल इनपुट आणि इंटेलिजेंसवर सुद्धा बारकाईने लक्ष असणार आहे. खासकरुन लोकांच्या हालचालींवर ही या सिस्टिमच्या माध्यमातून नजर असेल. तर वेळोवेळी तपासणी केली जावी असे सुद्धा अस्थाना यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.