दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी

कोर्टात हजर केल्यानंतर चार जणांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या सहा मधील चार कथित दहशतवाद्यांना रात्री कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात हजर केल्यानंतर चार जणांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य दोन जणांना आज कोर्टात आणले जाणार आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी कथित रुपात सहा दहशतवाद्यांना अटक केली. पोलिसांनी दावा केला की, यामधील दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानात ट्रेनिंग घेतली होती.(Noida: महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी 4 जणांना अटक, उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील घटना)

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कार्यवाही करत या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना गुप्तहेरांकडून देण्यात आली होती. त्यामुळे माहिती मिळताचे पोलिसांचे पथक सक्रीय होत त्यांना अटक केली. या व्यतिरिक्त अन्य चार जण हे उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे.(Jammu Kashmir Update: श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला, एक पोलीस अधिकारी शहीद)

Tweet:

ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे विस्फोटक आणि हत्यारे मिळाली आहेत. डीसीपी स्पेशल सेल प्रमोद कुमार कुशवाह यांनी असे म्हटले की, मल्टीस्टेट ऑपरेशनमध्ये आम्ही सहा जणांना ताब्यात घेतले. यामधील सहा जणांची नावे समीर, लाला, जीशन कमर, ओसामा, जान मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद अबु बकर अशी आहेत.