संंरक्षण मंंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र व भाजप आमदार पंकज सिंह यांना कोरोना, ट्विट करुन दिली माहिती
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे पुत्र आणि भाजप आमदार पंकज सिंह (BJP MLA Pankaj Singh) यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे पुत्र आणि भाजप आमदार पंकज सिंह (BJP MLA Pankaj Singh) यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाली आहे. पंकज सिंह यांनी ट्विट करुन आपली कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर पंंकज यांंनी खबरदारी म्हणुन चाचणी करुन घेतली होती. अलिकडेच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांंची प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान,गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला आयसोलेट करा आणि स्वतःची चाचणी करा” असे आवाहन पंकज सिंह यांनी ट्विट मधुन केले आहे.
पंकज हे उत्तर प्रदेशातील नोएडा मतदारसंघातून आमदार आहेत. तसेच पंंकज यांंच्याकडे उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात आजपर्यंत 14 राजकीय नेत्यांंना व मंंत्र्यांंना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यापैकी योगी आदित्यनाथ सरकार मधील कॅबिनेट मंंत्री कमला राणी वरुण आणि मंंत्री व क्रिकेटपटु चेतन चौहान यांंचे कोरोनाने निधन झाले आहे.
पंंकज सिंंह ट्विट
दुसरीकडे आज केंद्रीय संंरक्षण मंंत्री राजनाथ सिंंह हे तीन दिवसांच्या रशिया दौर्यावर मॉस्कोला रवाना झाले आहेत. शांघाय सहकार संघटना (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला राजनाथ सिंंह उपस्थित राहतील.