David Bradbury Deported from India: ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते डेव्हिड ब्रॅडबरी भारतातून हद्दपार; नेमकं घडलं तरी काय? घ्या जाणून

त्याच्या अटकेचा संबंध तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील निदर्शनांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या त्याच्या आधीच्या कार्याशी असल्याचे मानले जाते.

David Bradbury | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन माहितीपट निर्माते (Australian Filmmaker) डेव्हिड ब्रॅडबरी (David Bradbury) (वय 73) यांना भारतात आल्यानंतर चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chennai Airport) इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. दोन वेळा ऑस्करसाठी नामांकित झालेले ब्रॅडबरी, त्यांची दोन मुले, नकीता (21) आणि ओमर (14) यांच्यासोबत भारतात आले होते. ट्रीना लेंथल हिचे निधन झाल्यानंतर ते आपल्या मुलांसोबत भारता आले होते. मृत्यूनंतरचे भारती विधी आणि संस्कृती यांबाबत ते आपल्या मुलांना परिचय करुन देत होते. पत्नीच्या निधनानंतर पाच महिन्यांनी त्यांनी हा दौरा काढला होता. दरम्यान, थायलंडहून आल्यानंतर ब्रॅडबरीला 24 तासांसाठी ताब्यात घेण्यात आले. ज्या दरम्यान त्याला औषधे आणि मूलभूत शौचालय सुविधा कथीतपणे नाकारण्यात आल्या. त्यानंतर कारवाईचे कोणतेही स्पष्ट कारण न देता त्याला थायलंडला हद्दपार करण्यात आले. त्याला देश सोडण्यास भाग पाडले जात असताना त्याच्या मुलांना भारतातील त्यांचा प्रवास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय विमानतळावर झालेल्या कारवाईबाबत डेव्हिड ब्रॅडबरी यांनी 'द वायर'ला एक मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपणास अत्यंत वेदनादाई वागणूक मिळाली. मला कचरा आणि अस्वच्छ गाद्या आणि कपड्यांनी भरलेल्या घाणेरड्या खोलीत ठेवण्यात आले होते. आपणास प्राथमिक सुवीधाही नाकारण्यात आल्या. परिणामी मला अडगळीच्या खोलीतच आराम करावा लागला.

कुडनकुलम आंदोलनाशी संबंध

ब्रॅडबरीला संशय आहे की त्याच्या अटकेचा संबंध त्याच्या पूर्वीच्या भारतातील कामाशी असू शकतो. जवळपास बारा वर्षांपूर्वी म्हणजेच, 2012 मध्ये त्यांनी तामीळनाडूतील इदिनथकराई गावाला भेट दिली होती. जिथे त्यांनी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक निदर्शनांचे दस्तऐवजीकरण (कागदपत्रे एकत्रिकरण) केले. विशेषतः 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या फुकुशिमा आण्विक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, या भागातील मासेमारी समुदायाने या प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या 2012 च्या भेटीदरम्यान, ब्रॅडबरीला छळाचा सामना करावा लागला आणि निदर्शनांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करताना अधिकाऱ्यांनी त्यांना तात्पुरते ताब्यात घेतले होते. नंतर त्यांनी भारत सरकारच्या गावाजवळ अणुभट्ट्या बांधण्याच्या निर्णयावर टीका करणारा एक लेख प्रकाशित केला होता. आणि या भट्ट्या अतिशय धोकादायक असल्याचे म्हटले होते. (हेही वाचा, Actress Dame Maggie Smith Dies: अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

ब्रॅडबरी यांच्यावरील कारवाईवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया

दरम्यान, झालेल्या कारवाईबाबत बोलताना त्याच्या मुलांनी सांगितले की, काही कारणांमुळे आमच्या वडिलांना परत जावे लागले. पण त्यांनी आम्हाला भारतातील प्रवास कायम ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला अतिशय वेदना झाल्या आहेत. त्यांना अशाप्रकारे त्रास द्यायला नको होता. त्यांच्यासोबत जे घडले ते वाईट होते.