IPL Auction 2025 Live

Dabur India कडून COVID-19 विरुद्ध रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी च्यवनप्राश किती फायदेशीर यासाठी क्लिनिकल ट्रायल्सला सुरूवात

आता डाबर इंडियाला च्यवनप्राश च्या माध्यमातून कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी रूग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढते का? यासाठी आता क्लिकल ट्रायल सुरू करण्यात आली आहे.

Dabur (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता अ‍ॅलोपॅथीच्या बरोबरीने भारतामध्ये पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करून कोरोना विरूद्ध लढण्यासाठी रूग्णाची प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी विविध औषधांची, उपचार पद्धतींची चाचपणी सुरू करण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये आता डाबर इंडियाला च्यवनप्राश च्या माध्यमातून कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी रूग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढते का? यासाठी आता क्लिकल ट्रायल सुरू करण्यात आली आहे. Livemint च्या रिपोर्टनुसार, पुढील 6-8 माहिने देशभरात 5 वेगवेगळ्या भागात ही ट्रायल घेतली जाईल. च्यवनप्राश घेतल्याने श्वसनविकास कमी होतात का? कोरोनाचा धोका कमी करण्यास मदत होते का? हे तपासलं जाणार आहे.

सध्या आयुष मंत्रालयाकडून भारतीयांना रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी विविध उपाय सुचवण्यात आले आहेत. दरम्यान यामध्ये घरच्या घरी काही नैसर्गिक उपायांनी श्वसनाचा त्रास कमी करण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होणार आहे. यामध्ये सकाळी गरम पाण्याच्या गुळण्या, गरम पाणी, गरम हळदीचं दूध घेणं, च्यवनप्राश खाणं असे उपाय सूचवण्यात आले आहेत. मधुमेहींना शुगर फ्री च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नियमावलींनंतर भारतामध्ये अनेक कंपन्यांनी च्यवनप्राशच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे.

ट्रायल प्रोटोकॉल

ट्रायल प्रोटोकॉलनुसार, मिंटने दिलेल्या वृत्ताप्रमाणे 600 सुमारे 5-70 वयोगटातील निरोगी व्यक्तींना निवडून दोन गटांमध्ये विभागलं जाईल. त्यापैकी 300 जणांना नियमित कपभर दूध दिलं जाईल तर उर्वरित लोकांना दिवसातून दोनदा अर्धा ते एक टीस्पून च्यवनप्राश दिलं जाईल. वयोमानानुसार हे प्रमाण ठरेल त्यानंतर त्यांना ग्लासभर दूधपण दिले जाईल. 15-15 दिवसांनी सुमारे 3 महिने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. या काळात दोघांवरही कोरोना व्हायरसच्या या काळात शरीरात काय बदल होतात हे पाहिलं जाईल.

ट्रायलच्या दुसर्‍या पद्धतीमध्ये कोव्हिड 19 ची लागण झाल्यास त्याला शरीर कसे प्रतिसाद देते याची देखील चाचपणी केली जाणार आहे.

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस, लवंग, दालचिनी, मिरी, ओवा, मनुका यांचा काढा बनवून तो दिवसातून दोनदा प्यावा.दिवसातून दोनदा गरम दूध आणि हळदीचं मिश्रण प्यायल्याने देखील फायदा होऊ शकतो. नियमित गरम पाणी पिण्याची सवय ठेवा. दिवसभरात किमान 30 मिनिटं प्राणायम आणि योगसाधना करावी. आहारात लसूण, ओवा, जिरं, आलं असे मसाल्याचे पदार्थ आवर्जुन वापरा. असे उपाय सुचवले आहेत.