कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आढळतोय आता Cytomegalovirus व्हायरस, जाणून घ्या कसा कराल स्वत: चा बचाव
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आता आणखी एक नवा व्हायरस आढळून येत आहे. या व्हायरसचे नाव साइटोमेगालो (Cytomegalovirus) असून तो कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी आहे किंवा ज्यांना कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून बरे होण्यासाठी स्टेरॉइड दिले गेलेल्या रुग्णांमध्ये तो दिसून येत आहे. या संदर्भात एक प्रकरण बंगळुरु येथून समोर आले आहे.(COVID19 च्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कडकनाथ वाढवू शकतो, रिसर्च सेंटरचे ICMR ला पत्र)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार जयानगर स्थित अपोले रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीला अॅडवान्स लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्यामध्ये हा नवा व्हायरस आढळून आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर मणिपाल रुग्णालयात भरती झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीमध्ये सुद्धा हा व्हायरस आढळून आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपोलो रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णामध्ये साइटोमेगालो व्हायरस हा कोरोना झाल्यानंतर 4 आठवड्यांनी आढळून आला आहे. यासाठी त्याला उच्चस्तरीय महागड्या चाचण्या कराव्या लागल्या. सीएमवी सारखा व्हायरसचा शोध लागल्यानंतर लोअर रेसेपिरेटरी ट्रॅक्ट सॅम्पलची गरज भासते. त्यांना स्टेरॉइड देण्याऐवजी हायपरटेंशन आणि डायबिटीज सारखे आजार सुद्धा होते.(Coronavirus: स्तनदा मातांनी निसंकोचपणे कोरोना लस घ्यावी-डॉ. समीरण पांडा)
कसा कराल बचाव?
अपोलो रुग्णालयाचे पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअरचे चीफ आणि बीबीएसपीच्या एक्सपर्ट कमिटीचे मेंबर डॉ. रविंद्र मेहता यांनी असे म्हटले की, सीवीएम बहुतांशकरुन इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड रुग्णांवर हल्ला करतो. याचा तपास करणे या कारणामुळे मुश्किल होते की, यासाठी हायलेव्हल चाचणी करणे गरजेचे असते. त्याचसोबत योग्य सॅम्पलची गरज भासते. आम्ही आधी ब्रोंकोस्कोपीच्या मदतीने कोरोना रुग्णाचा तपास केला होता. मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मेहता यांनी असे म्हटले आहे की, या व्हायरसपासून जर स्वत:चा बचाव करायचा असेल तर डायबिटीज नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, त्याचसोबत कोरोनाच्या रुग्णांसाठी कमी प्रमाणात स्टेरॉइडचा वापर करावा.