Cyrus Mistry Passes Away: उद्योगपती साइरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चारोटी येथे मर्सिडीज रस्तादुभाजकाला धडकली
उद्योगपती साइरस मिस्त्री यांचे अपघाती निधन (Cyrus Mistry Passes Away) झाले आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद मार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) चारोटी (Charoti ) येथे सूर्या नदी (Surya River) पूलावर हा अपघात घडला.
उद्योगपती साइरस मिस्त्री यांचे अपघाती निधन (Cyrus Mistry Passes Away) झाले आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद मार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) चारोटी (Charoti ) येथे सूर्या नदी (Surya River) पूलावर हा अपघात घडला. मिस्त्री यांची मर्सिडीज कार रस्तादुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. सायरस मिस्त्री हे भारतच नव्हे तर जगभरातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या आदराने घेतले जाते. सन 2012 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपती त्यांची निवड झाल्यानंतर ते विशेष चर्चेत आले होते. कार अपघातात सायरस मिस्त्री यांच्या कारचा चालकही या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
साइरस मिस्त्री हे 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा समूहाचे अध्यक्ष बनले होते. टाटा समूहाच्या कंपनीचे ते अध्यक्ष होते. 2012 ते 2016 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. रतन टाटा हे टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर या समूराची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतली होती. पुढे 24 ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांना समूहाच्या अध्यक्ष पदावरुन हटवले.
साईरस पलोनजी मिस्त्री यांचा जन्म (4 जुलै 1968) एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई यथील कॅथेड्रल एवं जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी सिव्हील इंजिनियरींगमध्ये बीएस सोबत इंपीरिएल कॉलेज लंडन येथून पदवी घेतली. लंडन येथून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आणि लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी विज्ञान विषयातील पदवी घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)