Online Job Scam: नागपूर मध्ये YouTube वर व्हिडिओ लाईक करून पैसे मिळवण्याचा मोह पडला महागात; व्यक्तीने गमावले 77 लाख

तुम्ही तुमच्याही नकळत तुमच्या ऑनलाईन आवडी निवडीची, वर्तणूकीची माहिती देऊन जाता.

Online | Pixabay.com

आजकाल ऑनलाईन जॉब स्कॅमच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक लोकं या जाळ्यात अडकून पैसे गमावत आहेत. नागपूर मध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. 56वर्षीय व्यक्तीने 77 लाख गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीचं नाव Sarikonda Raju आहे. युट्युब वर व्हिडिओ लाईक करा आणि पैसे मिळवा या स्कीम मध्ये त्याची फसवणूक झाली आहे.

टेलिग्राम अकाऊंट वर राजू आणि फसवणूक करणार्‍या त्या व्यक्तीचा पहिला संबंध आला. व्हिडीओ लाईक करून पैसे मिळवण्यासाठी त्याने राजूला व्हिडिओ लाईक केल्याचा स्क्रिन शॉर्ट शेअर करण्यास सांगितले. सुरूवातीला सारे ठीक सुरू होते. राजूला कामाचे पैसे मिळत होते. आपली फसवणूक होईल याचा अंदाजही नसलेल्या राजूने पुढे त्याचे बॅंक डिटेल्स शेअर केले. त्याला वाटलं आपल्या पेमेंट साठीच हे डिटेल्स मागितले आहेत.

काही दिवसातच परिस्थिती बदलली. फसवणूक करणार्‍याने राजूच्या बॅंक अकाऊंट मधून गैर व्यवहार करायला सुरूवात केली. त्याच्या अकाऊंट मधून पैसे उकळले. या आर्थिक फसवणुकीला बळी पडताच गुन्हे शाखेने कारवाई केली. शनिवारी त्यांनी रामना मारोती रोडवरील गाडगे नगर येथील राहत्या घरातून सागर बनोडे नावाच्या बुकीला पकडले. या अटकेदरम्यान बनोडे हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित विश्वचषक सामन्यावर सट्टा स्वीकारताना आढळून आला, ज्यामुळे या प्रकरणातील संभाव्य बेकायदेशीर सट्टा उघड झाला.

एखादा व्हिडिओ लाईक करणं ही गोष्ट वरकरणी साधी सोप्पी वाटते पण यामध्ये अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्याही नकळत तुमच्या ऑनलाईन आवडी निवडीची, वर्तणूकीची माहिती देऊन जाता. New WhatsApp Scam Alert: अनेक भारतीय युजर्सना परदेशी नंबर वरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स, मेसेज; प्रतिसाद देणं पडू शकतं महागात 

सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच अशा गुन्ह्यांमधून समजामध्ये सायबर क्राईम बद्दल सजगता निर्माण करण्याची गरजही वाढल्याचं दिसून येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif