व्हिडिओ: प्रियंका गांधी 'पप्पू की पप्पी'; केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य
ते म्हणाले गांधी घराण्याने देशावर काही उपकार केले का? गाधी घराण्याशिवाय जर तुम्हाला कोणाला पाहायचे असेल तर आमचे बब्बर शेर नरेंद्र मोदी यांना पाहा, असेही शर्मा म्हणाले.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील एका जाहीर सभेत बोलताना केंद्रीय मंत्री महेश शर्मा (Mahesh Sharma) यांची जीभ राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भलतीच घसरली. ही सभा बुलंदशहर येथे आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्यावर बोलताना महेश शर्मा यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा उल्लेख पप्पी असा केला. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्याबाब आक्षेपार्ह विधान करण्यापूर्वी महेश शर्मा यांनी परमेश्वरालाही मूर्ख म्हणण्यास मगेपुढे पाहिले नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेने बुलंदशहर येथील जाहीर सभेत बोलतानाचा मंत्री महेश शर्मा याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एका मैदानात लोक खचाखच भरले आहेत. जेथे सभा सुरु आहे. या सभेत बोलताना मंत्री महोदयांनी पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले ममता बॅनर्जी यांनी इथे येऊन कथ्थक केले आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येऊन गाणे गायले तर त्यांचे कोण ऐकणार आहे. राहुल गांधी यांची संभावना पप्पू अशी करत महेश शर्मा म्हणले की, पप्पू म्हणतो की, मी पंतप्रधान बनणार. आता तर पप्पूची पप्पीही (प्रियंका गांधी) आलीआहे. (हेही वाचा, मतदार यादीमधून देशातील तब्बल 2 कोटी 10 लाख महिलांची नावे अदृश्य)
दरम्यान, या वेळी बोलताना मंत्री शर्मा यांनी गांधी-नेहरु कुटुंबावर जोरदार टीका केली. ते म्हणाले गांधी घराण्याने देशावर काही उपकार केले का? गाधी घराण्याशिवाय जर तुम्हाला कोणाला पाहायचे असेल तर आमचे बब्बर शेर नरेंद्र मोदी यांना पाहा, असेही शर्मा म्हणाले.