सप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस? वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या संबंधित संकेत देत असे म्हटले आहे की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण एक महत्वपूर्ण पाऊल ठरु शकते.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

भारतात लहान मुलांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यात सुरु होऊ शकते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या संबंधित संकेत देत असे म्हटले आहे की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण एक महत्वपूर्ण पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी पुढे असे म्हटले की, माझ्यामते जाइडस कॅडिलाने ट्रायल केले आहे. त्यांनी आपत्कालीन वापरासाठी सुद्धा मंजूरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ट्रायल सुद्धा लहान मुलांवर ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये पूर्ण होऊ शकते. दुसऱ्या बाजूला फायजरची लस अमेरिकेच्या नियामकांकडून आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. यासाठी आम्हाला अपेक्षा आहे की, आम्ही सप्टेंबर पर्यंत मुलांवर लसीकर करण्याच्या मोहिमेत यशस्वी होऊ शकतो.

भारतात सध्या वयस्कर अशा 42 कोटी लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. आतापर्यंत देशभरात जवळजवळ 6 टक्के लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. सरकारने या वर्षाच्या अखेर पर्यंत सर्व वयस्कर लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी जवळजवळ 1 कोटी लस दरदिवशी द्यावी लागणार आहे. सध्या दिवसाला फक्त 4-50 लाख कोरोनाची लस नागरिकांना दिली जात आहे. या व्यतिरिक्त 2021 अखेर पर्यंत 18 वर्षावरील नागरिकांना सुद्धा लस दिली गेली पाहिजे असा ही सरकाराचा विचार आहे. मात्र देशात लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास मंजूरी मिळालेली नाही.(दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटल मध्ये Brain Tumor Surgery होत असताना 24 वर्षांची रूग्ण पूर्ण वेळ करत होती हनुमान चालीसा चं पठण) 

एम्सच्या प्रमुखांनी म्हटले की, लहान मुलांसाठी लस गरजेची आहे. यासाठी भारत बायोटेक आणि जाइडस कॅडिलाची लस ही महत्वपूर्ण आहे. फायझरची लस फायदेशीर ठरु शकते. मात्र आमच्याकडे अधिक संख्या असल्याने कोरोनाची लस असणे गरजेचे आहे. या दिशेने आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबर पर्यंत मुलांसाठी एकाहून अधिक लस देशात उपलब्ध करुन द्यावी.