देशातील COVID-19 चा रिकव्हरी रेट 63.45% तर मृत्यूदर 2.3% - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
भारतात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. दिवसाला कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या 45 हजार, 49 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरुच आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. दिवसाला कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या 45 हजार, 49 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 12,87,945 वर पोहचला आहे. तर 30 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी म्हटले आहे. तसंच देशातील कोविड-19 चा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 63.45% असून मृत्यू दर (Mortality Rate) 2.3% इतका असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी कोरोना व्हायरसच्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या कोरोनाचे 4,40,135 अॅक्टीव्ह रुग्ण असून 8,17,209 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. (COVID-19 रुग्णांसाठी Favipiravir औषध भारतात लाँच करण्यासाठी सिपला कंपनी पूर्णपणे तयारीत)
ANI Tweet:
कोरोना व्हायरस वर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यावर पूर्णपणे मात करणे कठीण आहे. दरम्यान अनेक सण-समारंभांवरही कोविड-19 चे सावट आहे. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी सण साजरे करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी सरकारकडून विशेष गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)