COVID19 Recovery Rate: देशात कोरोना व्हायरस रिकव्हरी रेट 76.61 टक्क्यांवर; आजवर 27 लाखाहुन अधिक जण कोरोनामुक्त- आरोग्य मंंत्रालय

देशात कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट (COVID 19 Recovery Rate) सुद्धा बराच वेगाने वाढत आहे. आज घडीला कोरोना रिकव्हरी रेट हा 76.61 टक्के इतका असुन आजवर एकुण 27,13,934 जणांंनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Update In India: एकीकडे मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंंख्येत एकाच वेळी 78,761 रुग्णांंची मोठी वाढ झाली आहे परिणामी देशातील कोरोना रुग्णांचा (Coronavirus Total Number) आकडा हा 35,42,734 वर पोहचला आहे. साहजिकच हे आकडे चिंंताजनक भासत असले तरी आज केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने (Union Health Ministry) एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशात कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट (COVID 19 Recovery Rate) सुद्धा बराच वेगाने वाढत आहे. आज घडीला कोरोना रिकव्हरी रेट हा 76.61 टक्के इतका असुन आजवर एकुण 27,13,934 जणांंनी कोरोनावर मात केली आहे. यातील 64,935 जणांंना तर मागील 24 तासात डिस्चार्ज मिळाला आहे. (भारतामध्ये कोरोना व्हायरस चे 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर, 1.93 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.88 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर

आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या कोरोना मृतांंचा टक्का खाली येउन 1.79 % वर पोहचला आहे. देशात आजवर कोरोनामुळे 63,498 मृत्यु झाले आहेत.. (देशात 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज राहणार बंंद, 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 'ही' सुट)

ANI ट्विट

आजपर्यंत च्या कोरोना रिकव्हरी झालेल्या रुग्णांंच्या संंख्येने कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंंख्येच्या 3.55 पट पुढचा टप्पा गाठला आहे. देशात सध्या केवळ 7,65,302 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत

दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्रालयाकडुन अनलॉक 4 ची घोषणा करण्यात आली आहे, ज्यानुसार 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे, सामाजिक/ सांंस्कृतिक/ शैक्षणिक कार्यक्रमात 100 जणांंच्या उपस्थितीला सुद्धा सरकारने हिरवा कंंदील दाखवला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now