COVID-19 Vaccine Update: कोविड-19 वरील लसीला जानेवारी 2021 च्या सुरुवातीपर्यंत आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्यासाची शक्यता; Dr Randeep Guleria यांची दिलासादायक माहिती
भारतात विकसत होत असलेली लस अंतिम टप्प्यात आली असून या वर्ष अखेरीपर्यंत किंवा नववर्षाच्या सुरुवातील हा लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात येईल.
कोरोना व्हायरस (Coronavirus) पासून संरक्षण मिळवण्यासाठी जगभरात लसींची (Vaccines) निर्मिती केली जात आहे. अमेरिकेत फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक (BioNTech) लसीला मान्यता मिळाली असून इतर लसी विकासाच्या अखेरच्या टप्प्यात पोहचल्या आहेत. दरम्यान, भारतात एम्सचे डिरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी लसी संदर्भात महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक माहिती दिली आहे. भारतात विकसत होत असलेली लस अंतिम टप्प्यात आली असून या वर्ष अखेरीपर्यंत किंवा नववर्षाच्या सुरुवातील हा लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात येईल.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, "भारतात लसी विकासाच्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. भारतीय नियामक प्राधिकरणाकडून या लसीला या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा नववर्षाच्या सुरुवातीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लसीकरण सुरु करता येईल."
ANI Tweet:
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्रॅजेनेका निर्मित लसीचे पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटमध्ये उत्पादन होत आहे. या लसींसदर्भांत अत्यंत चांगला डेटा हाती आला आहे. ही लस सुरक्षित असून प्रभावी देखील आहे. आतापर्यंत 70,000 ते 80,000 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली असून याचे कोणतेही दुष्पपरिणाम समोर आलेले नाहीत, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. (Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine: जाणून घ्या जगातील सर्वप्रथम मान्यता मिळालेल्या लसीबद्दल खास गोष्टी!)
त्याचप्रमाणे SII ने सांगितले की, चेन्नई मधील स्वयंसेवकांसोबत झालेली घटना ही लस दिल्यामुळे झालेली नाही. कोविशिल्ड लस ही अगदी सुरक्षित असून त्याचा स्वयंसेवकांवर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी संबंधित स्वयंसेवकाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. बदनामी केल्याप्रकरणी कंपनीने 100 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे. (Covishield सुरक्षित, चैन्नई च्या स्वयंसेवकाचा दावा कोविड 19 लसीच्या दुष्परिणामामुळे नव्हे; SII चा दावा)
दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची संख्या 95,34,965 वर पोहचली असून त्यापैकी 89,73,374 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4,22,943 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशात कोरोना संसर्गामुळे एकूण 1,38,648 रुग्णांचा बळी गेला आहे.