IPL Auction 2025 Live

COVID 19 Vaccination Fresh Guidelines: कोविड वर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी मिळणार लस, आता स्तनदा माता देखील घेऊ शकतात लस; केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाची नवी नियमावली

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड19 प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत नव्या नियमावलीला जारी करत देशात आता कोविड 19 झाल्यास कधी लस घेऊन शकता? रज्तदान कधी करू शकता? स्तनदा माता लस घेऊ शकतात का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Corona Vaccination | Representational Image (Photo Credits: Pixabay

भारतामध्ये कोरोनचा (COVID-19 Second Wave) थैमान रोखण्यासाठी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसीच्या 2 डोस मधील अंतर वाढवण्याच्या निर्णयानंतर आज (19 मे) पुन्हा एकदा भारतात कोविड 19 ची प्रतिबंधात्मक लस (COVID-19 Vaccine) घेण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये कोविड 19 वर मात केल्यानंतर आता 3 महिन्यांनी लस मिळणार आहे तर स्तनदा मातांनाही आता लस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या दोन प्रमुख घोषणांसोबत पहा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने(Union Health Ministry) आज जारी केल्या नव्या नियमावलीमध्ये कोणकोणते नियम आहेत.

नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कडून स्वीकारण्यात आलेली नवी नियमावली भारतातील सार्‍या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आल्याची माहिती आज दिली आहे. या नव्या नियमावलीत कोविड वर मात केलेल्यांना आजारातून बरे झाल्यानंतर म्हणजे 3 महिन्यांनी आता कोविड 19 ची लस मिळेल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

काय आहेत नवे नियम

भारतात सध्या 18 वर्षांवरील सार्‍यांनाच कोविड 19 प्रतिबंधात्मक लस दिली जात आहेत. देशभर 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकार तर 18 - 44 वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकार मोफत करत आहे. भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि आता स्फुटनिक वी लस उपलब्ध आहे. कोविन अ‍ॅप, पोर्टल, आरोग्यसेतू अ‍ॅपकिंवा उमंग अ‍ॅप यांच्या माध्यमातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुम्हांला देशभर कोठेही लस घेता येणार आहे.