COVID-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात NCDC ची महत्त्वपूर्ण माहिती

यामुळे चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिजीज कंट्रोल चे डिरेक्टर सुजीत सिंह यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. पहिली, दुसरी त्यानंतर तिसऱ्या लाटेची (Third Wave) संभावना आहे. येणाऱ्या काळात भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका येत आहे. यामुळे चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिजीज कंट्रोल  (NCDC) चे डिरेक्टर सुजीत सिंह (Sujeet Singh) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. एक नवा वेरिएंट एकट्याने कोरोनाची तिसरी लाट आणू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

NDTV च्या रिपोर्टनुसार, NCDC चे संचालकांच्या मते पुढील सहा महिन्यात कोरोना स्थानिक स्वरुपाचा होईल. दरम्यानच्या काळात कोरोनाचा नवा वेरिएंट समोर आला तरी केवळ त्या एका वेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकणार नाही. तसंच पुढील 6 महिन्यांच्या कालावधी कोरोनाचे स्वरुप महामारीपासून स्ठानिक (कधीही न संपणारा स्थानिक रोग) असे बदलेल. (Covid-19 Third Wave: कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची- ICMR)

कोविड स्थानिक होईल म्हणजे संसर्ग पूर्वीपेक्षा कमी प्रभावी होईल आणि आरोग्य सेवांवर कमी ताण येईल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आले तर रोगावर नियंत्रण मिळवता येईल, असे सुजितसिंह यांनी सांगितले. केरळमध्ये देखील कोरोनाच्या तीव्र वेढा आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या सुमारे 20-30 टक्के लोकांना संसर्गाचा धोका असतो. मात्र लसीकरणानंतर कोरोना संपर्कात आल्यास संसर्गाचा धोका कमी होतो, असे सुजीत सिंह यांनी सांगितले. भारतात कोणताही नवा वेरिएंट नसून C1.2 आणि Mu स्ट्रेन अद्याप देशात सापडलेले नाहीत. तसंच एक नवा वेरिएंट तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरु शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif