COVID 19 Tests In India: देशात आजवर 3 कोटी हुन अधिक कोरोना चाचण्या, मृत्यु दर अवघ्या 2 टक्क्यांहुन कमी- आरोग्य मंत्रालय

यातील 7,31,697 चाचण्या तर केवळ कालच्या दिवसभरात पार पडल्या आहेत. या वाढत्या कोविड चाचण्यांंमुळे देशातील कोरोना रुग्णांची संंख्या अजुनही नियंत्रणात आहे

Covid 19 (Photo Credit Twitter)

केंद्रीय आरोग्य मंत्रालय )Health Ministry) आणि आयसीएमआर (ICMR) च्या माहितीनुसार आजवर देशात एकुण कोरोनाच्या 3 कोटीहुन अधिक चाचण्या(Coronavirus Test)  झाल्या आहेत, 16 ऑगस्ट पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास 3,00,41,400 इतक्या आजवर कोविड चाचण्या झाल्या आहेत. यातील 7,31,697 चाचण्या तर केवळ कालच्या दिवसभरात पार पडल्या आहेत. या वाढत्या कोविड चाचण्यांंमुळे देशातील कोरोना रुग्णांची संंख्या अजुनही नियंत्रणात आहे तसेच मृत्यु दर कमी होण्यासाठी सुद्धा या वेळेत घेतल्या जाणार्‍या कोरोना चाचण्यांची मदत होत आहे. परिणामी देशात कोविड-19 चा मृत्यू दर (Covid-19 Fatality Rate) अत्यंत कमी म्हणजे 2% पेक्षा कमी आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा कोविड-19 मृत्यू दर कमी आहे. तुलनेने पाहायला गेल्यास अमेरिकेत (USA) 23 दिवसांत 50,000 मृत्यू झाले होते. तर ब्राझील (Brazil) मध्ये 95 आणि मॅक्सिको (Mexico) मध्ये 141 दिवसांत मृतांचा आकडा 50,000 झाला होता. मात्र यासाठी भारताला 156 दिवस लागले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 26,47,664 इतका असुन आजवर  50,921 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 19,19,843 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 6,76,900 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.