COVID-19 Surge in India: वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशव्यापी मॉक ड्रिल्स; आरोग्य यंत्रणेच्या सुसज्जतेचा घेणार आढावा

भारतामध्ये गेल्या 24 तासांत भारतात 5,880 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय केसलोड 35,199 पर्यंत वाढला आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

भारतामध्ये वाढत्या कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19 Surge in India) आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर आल्या आहे. आजपासून दोन दिवसांचा मॉक ड्रिल (Mock Drills) देशातील विविध हॉस्पिटल्स मध्ये घेतला जाणार आहे. या मॉक ड्रिल्स दरम्यान कोविड 19 चा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा किती सुसज्ज आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. आज 10 आणि उद्या 11 एप्रिल दिवशी मॉक ड्रिल अंतर्गत खाजगी आणि शासकीय रूग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जाणार आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासांत भारतात 5,880 नवीन रुग्णांची नोंद झाली असून  सक्रिय केसलोड 35,199 पर्यंत वाढला आहे.

मागील महिन्यात देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांच्याकडून कोविड 19 रिव्ह्यू मिटिंग घेतली गेली होती. त्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल्स घेऊन आढावा घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच राज्यांना टेस्टिंग वाढवण्याचे, प्रिकॉशन डोस घेण्याच्या तसेच Covid-appropriate behaviour अवलंबण्याच्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

मॉक ड्रिल व्यतिरिक्त, मांडविया यांनी 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकार्‍यांसह तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी देशव्यापी मॉक ड्रिल सुरू झाल्यानंतर मांडविया यांनी त्यामध्ये सहभाग घेत हरियाणातील AIIMS Jhajjar ला भेट दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंट बद्दल अलर्ट जारी केला होता. XBB.1.16 चा प्रसार फेब्रुवारीमध्ये 21.6 टक्क्यांवरून मार्चमध्ये 35.8 टक्क्यांपर्यंत वाढला. अद्याप हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यूदरात वाढ झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif