केरळ-महाराष्ट्रातील Covid-19 प्रकरणांनी केंद्राची वाढवली चिंता; राज्यांना लिहिले पत्र, दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी उपयोजना करण्याचा सल्ला  

या ठिकाणचा वाढता सकारात्मकता दर आणि सक्रिय प्रकरणांमुळे केंद्र सरकारसमोर एक नव्हे आव्हान उभे राहिले आहे

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशभरात कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे कमी होत असताना, अचानक महाराष्ट्र आणि केरळमधील दैनंदिन प्रकरणांनी चिंता वाढवली आहे. या ठिकाणचा वाढता सकारात्मकता दर आणि सक्रिय प्रकरणांमुळे केंद्र सरकारसमोर एक नव्हे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मंत्रालयातील अजय भल्ला यांनी या संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना पत्र लिहिले आहे. गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात प्रशासनाला जे जिल्हे आणि क्षेत्रांमधील सकारात्मकता दर जास्त आहे, तेथे सक्रिय प्रतिबंधासाठी कडक पावले उचलण्यास सांगितले आहे.

भल्ला यांनी यासाठी स्थानिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पत्रात पुढे त्यांनी म्हटले आहे की, संसर्ग वाढण्याची चिन्हे ओळखण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी लागतील. सोबतच सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला गृह सचिवांनी दिला आहे.

पत्रात केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला म्हटले आहे की, दही हंडी आणि गणेशोत्सव असे सण येत्या काही दिवसात होणार आहेत. यामुळे मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक पातळीवर गर्दी आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. केंद्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या सणांच्या दरम्यान, स्थानिक पातळीवर लोकांच्या मेळाव्यावर बंदी घालण्याची सूचना केली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, गेल्या एक महिन्यात दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे, मात्र महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत जिथे संक्रमणाची संख्या वाढत आहे. आता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाने नियम लागू केले आहेत. (हेही वाचा: Covid-19 चा संसर्ग झालेल्यांवर Covaxin चा एक डोसही प्रभावी; दोन डोस इतक्याच अँटीबॉडी झाल्या तयार- ICMR)

दरम्यान, मागील 24 तासांत राज्यात 4,831 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 126 मृतांची नोंद झाली आहे. आज 4,455 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात 51,821 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहे.