
GDP Growth Rate: केंद्र सरकारने शुक्रवारी देशाच्या जीडीपीशी संबंधित महत्त्वाचा डेटा जारी केले. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर तिमाही आधारावर 7.4 टक्के वाढला. (GDP Growth Rate Rises). आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर 6.2 टक्के होता. तथापि, वार्षिक आधारावर जीडीपी विकास दरात घट नोंदवली गेली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर 8.4 टक्के होता. शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. चौथ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे अंदाजे 6.85 टक्के असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. परंतु, ही वाढ त्यापेक्षा अधिक चांगली आहे. (हेही वाचा - India's GDP Growth: भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; 2024-25 मध्ये 7 टक्के असू शकतो आर्थिक विकास दर- IMF)
आर्थिक वर्ष 2023-24 मधील GDP वाढीचा दर -
2024-25 या संपूर्ण आर्थिक वर्षात, देशाचा वार्षिक विकास दर 6.5 टक्क्यांपर्यंत घसरला. 2023-24 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 9.2 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च तिमाहीत विकास दरातील मंदीचे संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-25 च्या जीडीपी वाढीच्या दरावरही वाईट परिणाम झाला, ज्यामुळे तो 6.5 टक्क्यांपर्यंत खाली आला. राष्ट्रीय खात्यांच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात, एनएसओने 2024-25 साठी देशाचा विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. (हेही वाचा: GST on Softy Ice-Cream: व्हॅनिला फ्लेवर्ड सॉफ्टी आइस्क्रीमवर भरावा लागेल 18 टक्के जीएसटी; साखरेच्या मोठ्या प्रमाणामुळे दुग्धजन्य पदार्थ म्हणता येणार नाही- AAR)
2025-26 आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज -
दरम्यान, सीआयआयचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी 11 मे रोजी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.5 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. आकडे मूलभूतपणे साध्य करण्यायोग्य आहेत. अलिकडच्या काळात व्याजदर कमी झाले असून महागाई देखील कमी होत आहे.