Coronavirus च्या संकटाला लढा देण्यासाठी राहुल गांधी यांनी सांगितल्या 'या' 5 TIPS; नरेंद्र मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला
काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कोरोना व्हायरसच्या संकट काळात देशात स्थैर्य राखुन ठेवण्यासाठी 5 खास टिप्स दिल्या आहेत.
मागील आठवड्याभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) भारतातील संक्रमण वेगाने पसरत आहे. आतापर्यंत तब्ब्ल 1071 कोरोना रुग्ण देशात आढळून आले आहेत, तसेच 30 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या संकटातून देशाला वाचवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी कोणतेही राजकारण न करता काँग्रेसच्या लाखो कर्मचाऱ्यांचा परिवार केंद्र सरकार सोबत आहे असे आश्वासन देणारे एक पत्र काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लिहिले होते. याच पत्रातून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला 5 खास टिप्स दिल्या होत्या ज्यांचा वापर केल्यास या संकट काळात देशात स्थैर्य राखून ठेवण्यास मदत होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांच्या या खास टिप्स विषयी सविस्तर जाणून घ्या..
राहुल गांधी यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी सांंगितलेल्या 5 खास टिप्स
1) सामाजिक सुरक्षा मजबूत करा. सार्वजनिक संसाधनांचा वापर करा.
2) मजूर व कामगार यांना आर्थिक मदत करा.
3) हॉस्पिटल मध्ये बेड आणि व्हेंटिलेटर ची सुविधा सज्ज ठेवा.
4) सर्व वैद्यकीय व स्वच्छता उपकरणे सज्ज ठेवा.
5) रुग्णांचे आकडे कमी आहे मात्र देशात अनेकांची कोरोनाची चाचणीच झालेली नाही. या चाचण्या घेण्यासाठी टेस्ट किट्स ची संख्या वाढवा.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा मोदी व मोदी सरकारला कोरोनाच्या भीषणतेची जाणीव करून दिली आहे. या संकटाला लढा देण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर सुद्धा अनेकदा राहुल यांनी भाष्य केले आहे.काल लिहिलेल्या या पत्रात सुद्धा त्यांनी भारताला कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉक डाऊन पेक्षाही व्यापक विचार करण्याची आवश्यकता आहे असा इशारा मोदी सरकारला दिला आहे.