Coronavirus: कोरोना व्हायरस संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळलेच नाही- राहुल गांधी
हे संकट ओळखण्यास ते जेवढा वेळ लावलतील तेवढा प्रश्न अधिक गंभीर होणार हे नक्की. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल करत म्हटले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इव्हेंट मॅनेजर आहेत.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी आणि देशातील एकूणच स्थिती यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कोविड 19 (COVID 19) महामारी हे प्रकरणच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना कळले नाही. देशातील कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Epidemic) वाढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाफीलपणाच कारणीभूत आहे. हे संकट ओळखण्यास ते जेवढा वेळ लावलतील तेवढा प्रश्न अधिक गंभीर होणार हे नक्की. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल करत म्हटले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इव्हेंट मॅनेजर आहेत.
कोरोना व्हायरस लसीकरणाच्या मुद्दायवरुन बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आतापर्यंत केवळ देशातील तीन टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. म्हणजेच देशातील 97% नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग होऊ शकतो. लसिकरणाशी संबंधीत प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, आपण लसीची राजधानी आहोत. लसीकरणामुळे कायमस्वरुपी उत्तर मिळू शकेल. त्यामुळे हवी तेव्हा हवी तेवढी लस आपण मिळवू शकतो. सरकारने केवळ बहाने करणे बंद करावे. नेतृत्वाचा अर्थ हा नव्हे की मी काम करत नाही यात याच्या त्याच्या चुका आहेत. नेतृत्वाचा अर्थ आहे की हिंमत दाखवा. मी हे करु शकतो हे देशातील जनतेला दाखवा. वेळ न वाया घातवता आपण देशातील जनतेला मदत करायला हवी, असे राहुल गांधी यांनी सांगितले. (हेही वाचा, WhatsApp लवकरच सादर करेल खास फिचर; मोबाईल शिवाय Desktop वर करता येईल लॉगइन)
देशात सध्या जे वास्तव आणि खरे बोलत आहेत ते केवळ विरोधी पक्षातील लोकच आहेत. अनेक ठिकाणी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी विविध घटकांनी कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत चागले काम केले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. या वेळी त्यांनी कोरोना केवळ दुसऱ्या लाटेवरच थांबणार नाही तर तिसरी लाटही येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
एएनआय ट्विट
याच वेळी राहुल गांधी यांना टूलकिट प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना टूलकीट प्रकरण हे सरळसरळ खोटेपणा आहे. त्यांनी पुढे म्हटले की, आम्हाला हे समजून घ्यावे लागेल की आम्ही कोरोनाची लढाई लढतो आहोत. कोरना आपले रुप बदलतो. सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायजेशन, मास्क, लॉकडाऊन हे अस्थायी रुपात कोरोनाला रोखतात परंतू, हे काही दीर्घकालीन उपाय नाहीत. लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. जो कोरोनाला थांबवू शकतो, असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.