Coronavirus Outbreak In India: कोरोना रुग्णांची संख्या 15,712 वर; 507 जणांचा मृत्यू, 2231 जणांना डिस्चार्ज
देशातील रुग्णांची संख्या ही 15 हजार 707 वर पोहचली आहे. सद्य घडीला देशात कोरोना बाधित असे 12 हजार 696 रुग्ण आहेत, याशिवाय 507 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 2231 रुग्णांना बरे करण्यात वैद्यकीय विभागला यश आले आहे
देशभरातील कोरोना रुग्णांच्या (Coronavirus Patients Numbers) संख्येत गेल्या 24 तासात 1,334 नवी प्रकरणांची भर पडली आहे तर याशिवाय 27 नवे बळी गेले आहेत. सद्य घडीला देशात कोरोना बाधित असे 12 हजार 696 रुग्ण आहेत, याशिवाय 507 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 2231 रुग्णांना बरे करण्यात वैद्यकीय विभागला यश आले आहे. या सर्व आकडेवारीनुसार देशातील रुग्णांची संख्या ही 15 हजार 712 वर पोहचली आहे. देशातील कोरोनाबाधित राज्यांच्या यादीत सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात काल कोरोनाची 300 हुन अधिक नवी प्रकरणे समोर आल्याने सध्या राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत (148 ) आणि पुणे शहरात (78 ) आढळून आले आहेत.
अलीकडेच कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासा देत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही 40 % कमी होत असल्याचे म्हंटले होते. तसेच देशातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी 80% रुग्णांंना बरे करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता, मात्र ही आकडेवारी आता वेगळेच चित्र समोर आणत आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली मध्ये (1,707), मध्य प्रदेशात (1,355), तामिळनाडु मध्ये (1,323) आणि राजस्थान मध्ये (1,267) कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. कोरोना संदर्भात लाईव्ह अपडेट्स जाणुन घेण्यासाठी क्लिक करा.
पहा ट्विट
दरम्यान, जगभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा भीषण वाढला आहे, एकट्या अमेरिकेत मागील १२ तासात कोरोनाचे 1,867 बळी गेले आहेत. ज्यामुळे आतापर्यंतचा कोरोना मृतांचा आकडा हा 39 हजार 14 झाला आहे. तर कोविड-19 च्या रुग्णांची संख्या 7 लाख 39 हजारांवर पोहोचली आहे. तर जगभरात कोरोनाचे 23 लाख 31 हजार रुग्ण असून यापैकी 1 लाख 60 ज्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.