उबर कंपनीची फ्लिपकार्टसोबत भागीदारी; बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईतील नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्यास करणार मदत

त्यानुसार लॉकडाउनच्या काळात उबरकडून फ्लिपकार्टवरील खरेदी करण्यात आलेल्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येणार आहे. ही सुविधा बंगळूरू, दिल्ली आणि मुंबईसाठी सध्या सुरु करण्यात आली आहे.

Flipkart and Uber (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर देशभरात नागरिकांना मदतीसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तर लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जात आहे. मात्र नागरिकांनी अत्यावश्यक सेवासुविधांची खरेदी करताना गर्दी करु नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश दुकानदारांनी नागरिकांना घरपोच सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभुमीवर ई-कॉमर्स वेबसाईट्सवरील फ्लिपकार्टसोबत (Flipkart) उबर कंपनीने  (Uber Company) भागीदारी केली आहे. त्यानुसार लॉकडाउनच्या काळात उबरकडून फ्लिपकार्टवरील खरेदी करण्यात आलेल्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येणार आहे. ही सुविधा बंगळूरू, दिल्ली आणि मुंबईसाठी सध्या सुरु करण्यात आली आहे.

सोमवारी उबर कंपनीने फ्लिपकार्टसोबत लॉकडाउनच्या काळात भागीदारी करत अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात बहुतांश ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांची होम डिलिव्हरी सेवा बंद केली आहे. मात्र फ्लिपकार्टने काही दिवसांपूर्वी किराणामाल घरपोच सेवा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकार, आणि स्थानिक यंत्रणा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर फ्लिपकार्ट आता पुन्हा नागरिकांना किराणामाल देण्यासाठी बाहेर पडू शकणार आहे.(Coronavirus Lockdown: भारत देशात लॉकडाऊनच्या काळात Flipkart देणार नागरिकांना किराणामालाची घरपोच सेवा)

सध्या नागरिकांमध्ये 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला तर? अशी भीती आहे. मात्र सरकारकडून सातत्याने जीवानावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची माहिती दिली जात आहे. देशामध्ये गरीबांसाठी आता मोफत अन्नधान्य पुरवण्याची सोय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif