Coronavirus: पंजाबमध्ये लॉकडाऊन 2 आठवड्यांनी वाढवला; महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार?

या वेळी अमरिंदर सिंह यांनी लॉकडाऊन काळात काही काळ कर्फ्यूचे नियम शिथिल करण्यात येतील.

Amarinder Singh, Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जाहीर केलेला दुसरा लॉकडाऊन (Lockdown) कालावधी येत्या 3 मे रोजी संपत आहे. त्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. ही उत्सुकता असतानाच पंजाब सरकारने लॉकडाऊन कालावधी आणखी 2 आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लॉकडाऊन काळात सकाळी 7 ते 11 या 4 तासांच्या काळात नागरिकांना कर्फ्यूमध्ये सवलत दिली आहे. या काळात दुकाने आणि उतर उद्योग, व्यवसाय सुरु ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या लॉकडाऊन कालावधी समाप्तीनंर हा लॉकडाऊन वाढवणणारे पंजाब हे पहिले राज्य ठरले आहे. आता महाराष्ट्र सरकार आणि देशभरातील इतर राज्ये काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात येत असल्याचे सांगितले. या वेळी अमरिंदर सिंह यांनी लॉकडाऊन काळात काही काळ कर्फ्यूचे नियम शिथिल करण्यात येतील. तसेच या काळात उद्योग व्यवसाय सुरु ठेवता येतील असे सांगतानाच सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोर करण्याबाबतही नागरिकांना बजावले. दरम्यान, या आधी लॉकडाऊन काळात केवळ गहू खरेदी वगळता इतर सर्व व्यवहारांवर पंजाब सरकारने बंदी घातली होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले होते. लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाविरुद्धची लढाई लढताना विशेष खबरदारी घेतली जात आहे. आव्हानांचा समाना करण्यासाठी तयारीही केल्याचे म्हटले होते. मात्र, लॉकडाऊन वाढवणार की नाही याबाबत मात्र, थेट भाष्य केले नव्हते. (हेही वाचा, Lockdown मध्ये अडकलेल्या लोकांना दिलासा; स्थलांतरित कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना आपल्या घरी जाण्याची गृह मंत्रालयाची परवानगी)

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरस रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अपवाद फक्त केरळ राज्याचा. केरळ राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे या राज्यात कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला नाही. तर, इथे कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. इतर राज्यांमध्ये मात्र स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहीत इतर राज्यांमध्ये लॉकडाऊन कालवधी वाढणार की लॉकडाऊन संपणार याबाबत उत्सुकता आहे.