भारतात महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात आहे COVID-19 सर्वाधिक रुग्ण, पाहा राज्यनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) हैदोस घातला असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 70,756 च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 3604 नवे कोविड-19 (COVID-19) आढळले असून सद्य स्थितीत राज्यात एकूण 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत 2293 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. एकूणच ही आकडेवारी धक्का देणारी असून येणा-या काही दिवसांत कशा पद्धतीचे चित्र अेसल याचा अंदाज लावता येत नाही आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून सद्य स्थितीत राज्यात 23, 401 कोरोना संक्रमित असून 868 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर त्यापोठापाठ गुजरात, तमिळनाडू आणि नवी दिल्लीत सवधिक कोरोना रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. Coronavirus: रशियामध्ये कोरोना व्हायरसचा हाहाकार, 24 तासांत 11,656 संक्रमित रुग्णांची नोंद; इटली, ब्रिटनला टाकले मागे

पाहा भारतातील राज्यनिहाय कोरोना संक्रमितांची संख्या

S. No. Name of State / UT Total Confirmed cases* Cured/Discharged/Migrated Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 2018 975 45
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 65 34 2
5 Bihar 747 377 6
6 Chandigarh 174 24 2
7 Chhattisgarh 59 53 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 7233 2129 73
10 Goa 7 7 0
11 Gujarat 8541 2780 513
12 Haryana 730 337 11
13 Himachal Pradesh 59 39 2
14 Jammu and Kashmir 879 427 10
15 Jharkhand 160 78 3
16 Karnataka 862 426 31
17 Kerala 519 489 4
18 Ladakh 42 21 0
19 Madhya Pradesh 3785 1747 221
20 Maharashtra 23401 4786 868
21 Manipur 2 2 0
22 Meghalaya 13 10 1
23 Mizoram 1 1 0
24 Odisha 414 85 3
25 Puducherry 12 6 0
26 Punjab 1877 168 31
27 Rajasthan 3988 2264 113
28 Tamil Nadu 8002 2051 53
29 Telengana 1275 800 30
30 Tripura 152 2 0
31 Uttarakhand 68 46 1
32 Uttar Pradesh 3573 1758 80
33 West Bengal 2063 499 190
Total number of confirmed cases in India 70756# 22455 2293
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

तर दुसरीकडे रशियामध्ये मागील 24 तासांत कोरोना व्हायरसची 11,656 प्रकरणे समोर आली आहेत व अशाप्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 221,344 वर पोहोचली आहे. रशियामधील अर्ध्याहून अधिक प्रकरणे आणि मृत्यू या उद्रेकाचा केंद्रबिंदू असलेल्या मॉस्कोमधील आहेत. सोमवारी रशियाच्या राजधानीत एका रात्रीत 6,169 नवीन घटनांची नोंद झाली, अशाप्रकारे शहरातील रुग्णांची संख्या 115,909 झाली आहे. देशाच्या कोरोना व्हायरस रिस्पॉन्स सेंटरमध्येही एकूण 94 नवीन मृत्यूची नोंद झाली असून, एकूण मृत्यूची संख्या 2,009 वर गेली आहे.