Coronavirus In India: कोरोना व्हायरसग्रस्तांचा भारतातील आकडा 258; महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण

सध्या भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 258 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये आज (21 मार्च) देशाच्या विविध भागात असलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये 39 परदेशी नागरिकांसह दिल्ली, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्रात प्रत्येकी 1 मृत्यू असा हा आकडा 258 वर पोहचला आहे.

Coronavirus screening in Pakistan. (Photo Credit: ANI)

जगभरात झपट्याने पसरणारा कोरोना व्हायरसचा विळखा आता भारतामध्येही पसरायला सुरूवात झाली आहे. परदेशातून येणार्‍या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार पुढील उपचार दिले जात आहेत. दरम्यान सध्या भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 258 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये आज (21 मार्च) देशाच्या विविध भागात असलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये 39 परदेशी नागरिकांसह दिल्ली, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्रात प्रत्येकी 1 मृत्यू असा हा आकडा 258 वर पोहचला आहे. त्यापैकी 23 जणांवर कोरोनाचे उपचार यशस्वी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर 4 जणांचा दुदैवाने मृत्यू झाला आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 वर; राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण.

 भारत देशामध्ये कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च दिवशी नागरिकांना सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान 'जनता कर्फ्यू' मध्ये घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रामुख्याने लहान मुलं आणि वयोवृद्धांना पुढील 15 दिवसांच्या काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. सध्या देशात हा आजार रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनच्या दिशेने पाऊलं उचलली जात आहेत.

ANI Tweet

देशामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात हा आकडा 63 वर पोहचला आहे. तर मुंबई, नागपूर, पुणे, चिंचवड भागात आता 31 मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. तर सरकारी कार्यालयात 25% कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement