Coronavirus In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा साधणार संवाद; COVID 19 च्या परिस्थितीचा घेणार आढावा
आज तिसर्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री VC च्या माध्यमातून एकमेकांंशी कोरोना व्हायरस स्थितीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 एप्रिल) देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत Video Conferncing द्वारा संवाद साधणार आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी अशाप्रकारे दोन वेळेस विविध राज्यांतील परिस्थितींचा त्यांनी आढावा घेतला होता. भारतामध्ये 24 मार्चपासून लागू करण्यात आलेला कोरोना व्हायरस लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. आता 3 मे नंतर काय? या सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. Coronavirus Lockdown Relaxed: देशभरातील नोंदणीकृत दुकाने सुरु करण्यास MHA ची परवानगी; लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेले राज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यासोबतच केंद्राची समितीदेखील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाली आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये अनेक मजूर, कामगार विविध राज्यांत अडकले आहे. त्यापैकी ज्यांना त्यांच्या मुळगावी परत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सोय करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र सरकारकडून आज केली जाण्याची शक्यता आहे. तसेच इतर राज्यांत अडकलेल्या सामान्यांच्या, विद्यार्थ्यांचाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूकलाईव्हच्या माध्यमातून दिली आहे.
PMO India ट्वीट
At 10 AM, Shri @narendramodi will be interacting with state Chief Ministers via video conferencing. They will be discussing aspects relating to the COVID-19 situation.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासोबत यापूर्वी 20 मार्च आणि 11 एप्रिल दिवशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून चर्चा करून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान यावेळेस विविध राज्यांच्या परिस्थितींचा आढावा घेऊन एकामेकांसोबत कोरोनाशी लढण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या, नवी मॉडल्स काय असू शकतात या माहितीचं आदान प्रदान होतं. दरम्यान देशात आता कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. तर राज्यात 8चा टप्पा कोरोनाग्रस्तांनी ओलांडला आहे. त्यामुळे आता कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी उपाययोजना आणि कडक नियमांवलींसह पुढील योजना काय असेल याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. तसेच लॉकडाऊनमधून भारतीयांची कशी सुटका होणार याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)