Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 14,83,157 वर; मागील 24 तासांत 47,704 नव्या रुग्णांसह 654 मृतांची नोंद

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंता वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना बाधित 47,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Coronavirus in India (Photo Credits: Pixabay)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंता वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना बाधित 47,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 14,83,157 वर पोहचला आहे. तर एकूण 33,425 रुग्णांचा मृत्यूच्या नोंद झाली आहे. दरम्यान 14,83,157 पैकी 4,96,988 सक्रीय रुग्ण (Active Cases) असून 9,52,744 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे. (मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या)

इतर देशांच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असूनही भारतातील कोरोना संसर्गाची परिस्थिती चांगली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील दिलासादायक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत असून मृत्यूदरही कमी होत आहे. देशातील COVID19 चा रिकव्हरी रेट 64.23% असून रिकव्हरी रेट आणि मृत्यूदर यांचा रेश्यो 96.6%:3.4% इतका असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet:

देशात कोरोना संसर्गाचे संकट कायम आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसच्या चाचण्या करण्यासाठी देशात मुंबई, कोलकाता आणि नोएडा येथे हाय टेक लॅब्स उभारण्यात आल्या आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या लॅब्सचे उद्घाटन करण्यात आले.