Coronavirus: देशातील 62% कोरोना व्हायरस संक्रमित केवळ 5 राज्यांमध्ये;महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक अग्रक्रमांकावर
हेच प्रमाण कर्नाटक मध्ये 16.1 %, महाराष्ट्र 6.8 %, तमिलनाडु 23.9 % आणि उत्तर प्रदेशमध्ये 17.1% आहे.
देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या 29.70 लाखांहून अधिक आहे. ही संख्या विद्यमान स्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या 3.5 पटींनी अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण ( Rajesh Bhushan) यांनी ही माहिती दिली आहे. भूषण यांनी म्हटले की, गेल्या 24 तासात 11 लाखांहून अधिक नागरिकांची कोविड-19 चाचणी करण्या आली आहे. एक दिवसात 68,584 रुग्ण बरे झाले आहेत. देभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 62% टक्के रुग्ण हे केवळ 5 राज्यांमध्ये आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), दिल्ली, कर्नाटक (Karnataka), तमिलनाडु आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांमध्ये कोरोनामुळे 70 टक्के मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पुढे बोलताना सांगितले की आतापर्यंत भारताने 4 कोटी 50 लाखांहून अधिक कोरोना व्हायरस चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासात 11 लाख 72 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे 29,70,000 इतकी झाली आहे. रिकवरीचे प्रमाण 29.70 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. (हेही वाचा, Coronavirus in India: देशात मागील 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ; एकूण रुग्णसंख्या 38,53,407 तर 67,376 जणांचा मृत्यू)
राजेश भूषण यांनी पुढे बोलताना सांगितले की, देशभरतमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी आंध्र प्रदेशमध्ये या आठवड्यात 13.7% घट झाली आहे. हेच प्रमाण कर्नाटक मध्ये 16.1 %, महाराष्ट्र 6.8 %, तमिलनाडु 23.9 % आणि उत्तर प्रदेशमध्ये 17.1% आहे. सप्ताहीक मृत्यू दरातही आंध्र प्रदेशमध्ये 4.5, महाराष्ट्रात 11.5 आणि तामिळनाडू मध्ये 18.2 टक्क्यांची घट झाली आहे.