Coronavirus: सेना भवन इमारतीचा काही भाग सील; एक जवान कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह
भारतीय लष्कराच्या रुग्णालयातील सुमारे 24 लोक कोरोना संक्रमित असल्याचे पुढे आले होते. तेव्हाही सॅनेटाईजेशन करण्यात आले होते. यात लष्करात कार्यरत असलेल्या आजी-माजी अधिकारी आणि जवानांचाही समावेश होता. दिल्लीतील भारतीय लष्करातील रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलही निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
राजधानी दिल्ली (Delhi) येथील भारतीय लष्कराचे मुख्यालय सेना भवन ( Sena Bhawan) इमारतीतील काही भाग सील करण्यात आला आहे. मुख्यालय सेना भवनातील एका जवानाची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार जवानाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर शुक्रवारपासून या इमारतीचा काही भाग सील करण्यात आला. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटेशन आणि निर्जतुकीकरण करण्यासाठी सना भवनाचा काही भाग बंद करण्यात आला आहे. प्रोटोकालनुसार संक्रमित जवानाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. ज्यांची माहिती उपलब्ध झाली आहे त्यांना क्वारंटीन कण्यात येत आहे.
दरम्यान, या आधी 4 मे रोजी भारतीय लष्कराच्या रुग्णालयातील सुमारे 24 लोक कोरोना संक्रमित असल्याचे पुढे आले होते. तेव्हाही सॅनेटाईजेशन करण्यात आले होते. यात लष्करात कार्यरत असलेल्या आजी-माजी अधिकारी आणि जवानांचाही समावेश होता. दिल्लीतील भारतीय लष्करातील रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलही निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. भारतीय लष्कार्चाय वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले की, हॉस्पीटलच्या ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कोरना व्हायरस संक्रमित 24 रुग्णांवर उपचार सुरु आहे. रुग्णांना दिल्लीच्या छावणी परिसरात बेस रुग्णालयात दाखर करण्यात आले. (हेही वाचा, देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी; कोविड 19 चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आवाहन)
दरम्यान, या आधी लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी म्हटले आहे की, भारतीय लष्करातील कोरोना व्हायरस संक्रमित पहिला जवाना उपचारानंतर ठणठणीत बरा झाला आहे. तो पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू झाला आहे. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, मुंबईमध्ये नौदल युनिटमध्ये कोरोनाची 38 प्रकरणे पुढे आली आहेत. त्यातील 12 जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. उर्वरीत 26 जणांवर उपचार सुरु आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2020 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

