Corona Vaccine Formula इतर कंपन्यांसोबत शेअर करा; अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सल्ला
या पत्रात त्यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी नियंत्रणासाठी सल्ला दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मंगळवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी नियंत्रणासाठी सल्ला दिला आहे. या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, देशातील कोरोना लसीकरण (Corona Vaccination) वाढविण्यासाठी कोरोना लसीचे उत्पादन वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोना उत्पादक कंपन्यांनी कोरोना व्हॅक्सीन फॉर्म्युला (Corona Vaccine Formula ) इतर कंपन्यांसोबत शेअर करायला हवा. जर कोरोना लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले तरच देशातील राज्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करता येईल.
दरम्यान, या आधीही केजरीवाल यांनी एक डिजिटल प्रेस कॉन्फरन्स घेत कोरोना विरोधात वॅक्सिनेशन ड्राईव्ह वेगवान करण्याची आवश्यकात व्यक्त केली होती. केजरीवाल यांनी म्हटले होते की, देशात युद्धपातळीवर कोरोना लसीचे उत्पादन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोरोना लस निर्मितीचे काम केवळ दोन कंपन्यांकडेच असता कामा नये. तर त्यासाठी कोरोना व्हायरस लस निर्मितीचा फॉर्म्युला हा इतर कंपन्यांसोबत शेअर करायला हवा, असेही केजरीवाल यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Coronavirus उपचारादरम्यान Ivermectin औषधाच्या वापरावरुन WHO कडून पुन्हा एकदा गंभीर इशारा)
केजरीवाल यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही दररोज सव्वा लाख लसीीचे डोस टोचत आहोत. प्रतिदिन 3 लाख लोकांचे लसीकरण करण्याचा आमचा विचार आहे. परंतू, आम्हाला कोरोना लसीचा तुटवडा भासतो आहे हीच आमच्यावपुढील सर्वात मोठी समस्या असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही दिवस पुरेल इतकीच कोरोना लस आहे आणि ही केवळ आमचीच नव्हे तर प्रत्येक राज्यासमोरची समस्या आहे. काही राज्ये तर अशी आहेत त्यांच्याकडे लसच पोहोचली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे अद्याप कोरोना लसीकरणही सुरु नाही. कोरोना लस बनविणाऱ्या कंपन्या दोनच आहेत. ज्या महिन्यात केवळ 6-7 कोटी इतक्याच प्रमाणावर कोरोना लस बनवतात. त्यामुळे भारतात युद्धपातळीवर कोरोना लस निर्मीती होण्याची आवश्यकता असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.