Congress Party President Elections: राजस्थानच्या पेचानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर, पवन बन्सल उमेदवारीच्या रिंगणात

परिणामी काँग्रेस अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव बाजूला पडले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Congress Party President Elections) कोण उमेदवार रिंगणात उतरणारयाबाबत उत्सुकता आहे.

Pawan Bansal, Shashi Tharoor | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थान काँग्रेसच्या सुमारे 90 आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला. परिणामी काँग्रेस अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव बाजूला पडले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Congress Party President Elections) कोण उमेदवार रिंगणात उतरणारयाबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, दोन नावे तर आतापर्यंत पुढे आली आहेत. त्यापैकी एक आहेत शशि थरूर (Shashi Tharoor) आणि दुसरे आहेत पवन बन्सल (Pawan Bansal). त्यामुळे अध्यक्षपदाच्या इच्छुक नावासाठी स्पर्धा आणखी कमी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, दिग्वीजय सिंह रिंगणात उतरण्याचीही शक्यता बोलून दाखवली जात आहे.

काँग्रेसचे खजिनदार पवन कुमार बन्सल यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या आयएएनएसच्या वृत्तानुसार, ते नामांकन दाखल करतील की नाही हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारीतून वगळण्यात आले आहे. या पदासाठी कुमारी सेलजा ( Kumari Selja) यांचा सर्वोच्च पदासाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांच्या नावाला पसंती असल्याचीही चर्चा आहे. (हेही वाचा, Sachin Sawant: PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही? कॉंग्रेसचा थेट भाजपला सवाल)

ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नावाचीही काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चर्चा होती. मात्र, कमलनाथ यांनी सांगितले की, मला पक्षाध्यक्ष व्हायचे नाही आणि मध्य प्रदेशात पक्षासाठी काम करत राहायचे आहे. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कमलनाथ यांनी सोमवारी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसमधील अनेक जाणकारांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि तो प्रत्यक्ष थेट निवडणुकीतून आलेला असावा, अशी मागणी वारंवार केली आहे. तरीही प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडत नव्हती. अखेर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर आता अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर होत आहे.

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार मानले जात होते. त्यामुळे राहुल गांधी यांनीच ही निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेस पक्षातून होत होती. मात्र, राहुल गांधी सध्या 'कश्मीर ते कन्याकुमारी' अशा प्रदीर्घ भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या भूमिकेत नाहीत, असा अर्थ काढला जातो आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे असेल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. असेही मानले जात आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष कोणीजरी झाले तरी, ते गांधी कुटुंबीयांच्या मर्जीतीलच असतील हे नक्की.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif