Congress On RSS Survey For BJP: भाजपमध्ये खळबळ, आरएसएसचा सर्व्हे निमित्त; काँग्रस पक्षाचा मोठा दावा
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (India Jodo Yatra), अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक, मल्लिकार्जून खडगे यांची पक्षाध्यक्ष म्हणून झालेली निवड आणि राहुल गांधी यांची सुधारलेली प्रतिमा या सर्वांचा काँग्रेस पक्षाला जोरदार फायदा होताना दिसतो आहे.
Congress Claim on Madhya Pradesh: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (India Jodo Yatra), अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक, मल्लिकार्जून खडगे यांची पक्षाध्यक्ष म्हणून झालेली निवड आणि राहुल गांधी यांची सुधारलेली प्रतिमा या सर्वांचा काँग्रेस पक्षाला जोरदार फायदा होताना दिसतो आहे. त्यामुळे काँग्रेसही मोठ्या आत्मविश्वासात वावरताना दिसते आहे. त्यातूनच काँग्रेसने मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत जोरदार दावा केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेकदा सर्व्हे (RSS Survey For BJP) घेतला आहे. त्या सर्व्हेच्या निकालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरएसएसने केलेल्या सर्वच सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत येत असल्याचे जनमत पुढे आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आरएसएसच्या सर्व्हेमुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचेही म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर एक दीर्घ पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये काँग्रेसने आकडेवारी आण तारखांसह माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, मध्य प्रदेश राज्यात काँग्रेसचे सरकार बहुमतात येत आहे. इतकेच नव्हे तर भाजपला केवळ 55 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेस पक्षाकडे जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे मुद्दे आहेत. शिवाय कमलथना यांच्यासारखा प्रदीर्घ अनुभवी आणि मध्य प्रदेशच्या जनतेला 2018 मध्ये 15 महिन्यांचे कार्यक्षम सरकार देणारा नेता काँग्रेसकडे असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, 'Now I Am A Common Man' राहुल गांधी यांच्या उद्गारांनी जिंकली उपस्थितांची मने)
भाजप सरकारविरोधात मध्य प्रदेशच्या जनतेमध्ये एक तीव्र लाट आहे. भाजपने मागच्या 18 वर्षांमध्ये केवळ घोषणा केल्या. त्या घोषणांची पूर्तता भाजपकडून झाली नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आरएसएसने आतापर्यंत वेगवेगळे सहा सर्व्हे केले. या सर्वच सर्व्हेंमध्ये भाजपचा थेट आणि दारुण पराभव होत असल्याचे स्पष्ट चित्र पुढे आले आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने दावा करत म्हटले आहे की, जनता आणि भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्याकडून मागणी होत आहे की, भाजपमधील विद्यमान 60% आमारांचे तिकीट या वेळेला कापायला हवे. आरएसएसने आतापर्यंत सहा सर्व्हे केले. त्यापैकी जानेवारी 2023 च्या सर्व्हेत भाजपला 103 जागा मिळतील असे पुढे आले आहे. फेब्रुवारी 2023 च्या सर्व्हेत 95 जागा, मार्च 2023 मध्ये- 80 पेक्षा कमी जागा मिळतील अशी माहिती या सर्व्हेत पुढेआल्याचा दावा काँग्रेस करते.
ट्विट
दरम्यान, एप्रील 2023 मध्ये दैनिक भास्कर आणि सोबतच इतरही अनेक वृत्तसमूहांनी विविध सर्व्हे केले. त्या सर्व सर्व्हेंमध्ये भाजपला 70 च्या आसपास जागा मिळतील असेल म्हटले आहे. अगदील अलिकडे मे 2023 मध्ये केलेल्या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व्हेमध्ये भाजपला 65 जागा मिळतील असे म्हटले आहे. तर जून 2023 चा सर्व्हे नवभारत समाचारने प्रकाशित केला. यात भाजप सत्तेबाहेर जात असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारच येईल असा जोरदार दावा काँग्रेसने केला आहे.