IPL Auction 2025 Live

Loksabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती

आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) उमेदवार के एनी राजा यांच्याशी होणार आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली. तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड (Waynad) लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने (Helicopter) निलगिरीत उतरले.  (हेही वाचा - Loksabha Election 2024: सरकार आल्यास पश्चिम यूपीला वेगळे राज्य करणार, मायावतींची घोषणा)

2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) उमेदवार के एनी राजा यांच्याशी होणार आहे. विशेष म्हणजे के एनी राजा हे INDIA आघाडीतील मित्र पक्षातले आहेत. याशिवाय वायनाड मतदारसंघात भाजपचे के सुरेंद्रन यांचंही राहुल गांधी यांना आव्हान आहे. 20 लोकसभा जागा असलेल्या केरळात एकाच टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर तामिळनाडुतल्या 39 जागांसठी 19 एप्रिलला मतदान होईल.

केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून या जागेवर काँग्रेसचा कब्जा आहे. या मतदारसंघात 7 विधानसभा जागा येतात. यात मनंथावाडी, सुल्तानबथेरी, कल्पेट्टा आणि कोझीकोड जिल्हे येतात. 2009 या जागेवर काँग्रेसचे एमआय शानसाव खासदार निवडून आले होते. वायनाड आणि मलप्पुरम भागात काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने सातत्याने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत राहुलच्या वायनाड जिंकण्याच्या मार्गात फारशा अडचणी येणार नाहीत.