कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी चिनी अॅप TikTok च्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार नाहीत
वरिष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi ) यांनी चीनी अॅप टिकटॉक (TikTok) च्या बाजूने कोर्टात बाजू मांडणार नसल्याचे बुधवारी (1 जुलै) स्पष्ट केले आहे.
वरिष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi ) यांनी चीनी अॅप टिकटॉक (TikTok) च्या बाजूने कोर्टात बाजू मांडणार नसल्याचे बुधवारी (1 जुलै) स्पष्ट केले आहे. संघवी यांनी असे म्हटले आहे की, यापुर्वी सुप्रीम कोर्टात त्यांनी बाजू मांडली होती त्यावेळी ते जिंकले होते. परंतु आता कोर्टात चीनी अॅप टिकटॉकच्या बाजूने लढणार नाही आहेत.(भारताकडून चीनला अजून एक झटका; आता देशातील 'हायवे प्रोजेक्ट्स'मध्ये चिनी कंपन्यांना परवानगी नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती)
यापूर्वी देशातील माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुद्धा टिकटॉकच्या वतीने खटला लढण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. रोहतगी यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले होते की, भारत सरकारच्या विरोधात कोर्टात उभे राहणार नाही. टिकटॉकने या प्रकरणी त्यांची बाजू मांडण्यासाटठी रोहतगी यांना संपर्क केला होता. परंतु त्यांनी यासाठी पूर्णपणे नकार दिला. रोहतगी यांनी पुढे असे ही म्हटले की, भारत सरकारच्या विरोधातील खटल्यासाठी ते कोर्टात उभे राहणार नाहीत.(भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी TikTok साठी सरकार विरूद्ध कायदेशीर लढाई लढण्यास दिला नकार)
दरम्यान, भारत सरकारने सोमवारी एकूण 59 चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉक आणि युजी ब्राउजर यांचा सुद्धा समावेश आहे. आयटी मंत्रालयाने एका अधिकृत विधानात असे म्हटले आहे की, विविध स्रोतांच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली असून त्यामध्ये अॅन्ड्रॉइड आणि आयओएस वर उपलब्ध असलेल्या काही मोबाईल अॅपच्या माध्यमातून दुरपयोग करण्यात आल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. त्यानुसार रिपोर्टमध्ये असे ही म्हटले आहे की, युजर्सचा खासगी डेटा चोरी करुन तो विदेशात पाठवण्याच्या काही गोष्टी सुरु होत्या.