योगदिनी लष्करी जवान आणि श्वानपथकाच्या फोटोवर केलेल्या ट्विटनंतर राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

योगदिनी लष्करी जवान आणि श्वानपथकाच्या फोटोवर केलेलं ट्विट राहुल गांधी यांना चांगलंच महागात पडलं आहे. प्रचंड टीकेनंतर आता त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

योगदिनी लष्करी जवान आणि श्वानपथकाच्या फोटोवर केलेल्या ट्विटनंतर राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
Congress president Rahul Gandhi and the FIR lodged against him. (Photo Credit: Facebook/Twitter)

21 जून रोजी पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला. या निमित्ताने सेनेच्या जवानांनी श्वानपथकासह योगासनं करतानाचा फोटो ट्विट केला होता. यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress President Rahul Gandhi) यांनी 'न्यू इंडिया' (New India) असं म्हणत हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला. त्यानंतर भाजप नेते राहुल गांधींवर चांगलेच संतापले. तर नेटकऱ्यांनीही राहुल गांधींना ट्रोल केले. आता मात्र राहुल गांधी यांच्या समस्या अधिक वाढताना दिसत आहेत. कारण भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करत मुंबईतील एका वकीलाने राहुल गांधींविरुद्ध आझाद मैदान पोलिस स्थानकात (Azad Maidan Police Station) तक्रार दाखल केली आहे. (लष्करी जवानांच्या योगदिनाच्या 'त्या' फोटोवरील ट्विट नंतर राहुल गांधी सोशल मीडियात ट्रोल)

राहुल गांधी यांच्या विरुद्ध लेखी तक्रार दाखल:

राहुल गांधी यांनी केलेले ट्विट:

हे ट्विट करुन राहुल गांधी यांनी फक्त भारतीय सेनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला नाही तर सेनेचा अपमानही केला असल्याचे वकील अटल दुबे (Atal Dubey) यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2019 08:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).