पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट कायम, फरीदकोटमध्ये किमान तापमान एक अंश सेल्सिअसवर
तेथे किमान तापमान 4.5 अंश नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
हरियाणा आणि पंजाबच्या अनेक भागात शनिवारीही थंडीची लाट कायम होती. फरीदकोटमध्ये किमान तापमान एक अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्याने ही माहिती दिली. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, फरीदकोट हे पंजाबमधील सर्वात थंड ठिकाण होते. आकडेवारीनुसार, पंजाबमधील पठाणकोटमध्ये किमान तापमान 2.3 अंश सेल्सिअस, तर गुरुदासपूरमध्ये 2.8 अंश आणि भटिंडामध्ये 3.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. (हेही वाचा - आजचा हवामान अंदाज: तापमान वाढले तरी, राज्यात गारठा राहणार; जाणून घ्या IMD Weather Forecast)
त्यानुसार अमृतसरमध्ये 3.4 अंश सेल्सिअस, लुधियानामध्ये 7.8 अंश सेल्सिअस आणि पटियालामध्ये 6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, हरियाणातील कर्नालमध्ये किमान तापमान चार अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर हिस्सार आणि भिवानीमध्ये किमान तापमान 4.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान खात्याने सांगितले की, नारनौलमध्ये प्रचंड थंडी आहे. तेथे किमान तापमान 4.5 अंश नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.