Kerala CM Pinarayi Vijayan Protest Jantar Mantar: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे जंतरमंतर येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
केरळच्या कथित आर्थिक दुर्लक्षाबाबतच्या चिंतेकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आणि निदर्शने केली जाणार आहेत.
केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे (LDF) सरकार मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील जंतरमंतर (Jantar Mantar) येथे येत्या 8 फेब्रुवारी रोजी निदर्शने करणार आहे. केरळच्या कथित आर्थिक दुर्लक्षाबाबतच्या चिंतेकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आणि निदर्शने केली जाणार आहेत. केंद्र सरकारद्वारे इतर बिगर-भाजप-शासित राज्यांवर अन्याय केला जातो आहे, असा सूर जवळपास सर्वच भाजपेत्तर राज्ये आणि विरोधकांकडून उमटत आहे. या पार्श्वभूमीवर पिनराई विजयन यांचे आंदोलन आणि त्यांच्या पक्षाची भूमिका देशभरात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरली आहे.
आर्थिक दुर्लक्षाविरोधात आंदोलन
सीपीआय(एम) चे राज्य सचिव एमव्ही गोविंदन यांनी आगामी आंदोलनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, केरळच्या समस्यांच्या मर्यादेच्याही पलीकडे विस्तारलेल्या आहेत. हे केवळ केरळमध्ये घडते आहे असेच नव्हे. देशभरातील भाजपेत्तर राज्यांमध्ये असेच घडते आहे. त्यामुळेच हे केरळची जनता आणि सरकारने केलेले हे देशभरातील बिगर-भाजप राज्यांनी सामायिक केलेल्या व्यापक चिंता आणि केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधाचे सामूहिक प्रतिनिधित्व आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी सर्व बिगर-भाजप मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून या आंदोलनासाठी पाठिंबा मागितला आहे. केरळ सरकारने पुकारलेल्या आंदोलनांमधील महत्त्वाचा मुद्द्यात राज्यांच्या स्वायत्ततेवरील अतिक्रमण आणि केंद्राने लादलेल्या आर्थिक अडचणींचा समावेश आहे. (हेही वाचा, Kerala Governor On Cm Pinarayi Vijayan: ताफ्यावरील हल्ल्यानंतर केरळच्या राज्यपालांचा मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर मोठा आरोप)
श्रद्धांच्या सांप्रदायिकीकरणाबद्दल चिंता:
MV गोविंदन यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याबद्दल जनतेच्या मनात असलेला असंतोष व्यक्त केला. त्यांनी भाजपवर धार्मिक भावना भडकविण्यासाठी प्रक्षोभक पद्धतींचा वापर केल्याचा आरोप केला. धार्मिक श्रद्धांचे राजकारण करणे आणि सांप्रदायिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी भाजपवर टीका केली. विशेषतः, गोविंदन यांनी अपूर्ण राम मंदिराच्या होऊ घातलेल्या उद्घाटनावर भाष्य केले. हे उद्घाटन म्हणजे भाजप आणि केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याचे राजकीय साधन म्हणून केलेले ब्रँडिंग असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीतील फायद्यासाठी धार्मिक भावनांचा वापर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नाविरुद्ध त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या धोरणाचा सर्वच विरोधक विरोध करत असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Pinarayi Vijayan On Kerala governor: 'संघ परिवाराचे प्रतिनिधी', मुख्यमंत्री पनराई विजयन यांचा केरळच्या राज्यपालांना टोला)
विरोधकांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन:
सीपीआय(एम) राज्य सचिवांनी विरोधकांची धर्मनिरपेक्ष भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्मावर विश्वास ठेवण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार असायला हवा. तथापि, शंकराचार्यांसारख्या काही धार्मिक नेत्यांचा आक्षेप असूनही, राम मंदिराच्या उभारणीला निवडणुकीची रणनीती म्हणून भाजपने हात घातल्याबद्दल त्यांनी टीका केली. गोविंदन यांनी राजकीय फायद्यासाठी धार्मिक श्रद्धांचा गैरफायदा घेण्याविरोधात विरोधकांच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला.