CID Constable Arrested in Liquor Smuggling: कच्छमध्ये सीआयडी कॉन्स्टेबल नीता चौधरीला दारू तस्करासह अटक; पोलिसांना गाडीने चिरडण्याचाही केला प्रयत्न
यावेळी पोलिसांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता नीता चौधरी व तिच्या साथीदाराने पोलिसांवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसासह पकडलेल्या दारू तस्करावर खुनासारखे 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
CID Constable Arrested in Liquor Smuggling: गुजरातमधील (Gujarat) दारूबंदीला केवळ जनताच नाही, तर पोलीसही झुगारत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी अनेकवेळा पोलिसांवर अंमली पदार्थांच्या तस्करीत माफियांशी हातमिळवणी केल्याचा आरोप आहे. आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दारू तस्करीप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पूर्व कच्छमधील सीआयडी क्राइम ब्रँचमध्ये तैनात असलेली नीता चौधरी (Nita Chaudhary) या महिला पोलिसाचा दारू तस्करीत सहभाग होता. ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती आणि पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने कर्मचाऱ्यांवर गाडी चालवण्याचाही प्रयत्न केला.
गुजरातमध्ये संपूर्ण दारूबंदी आहे, मात्र तस्करीची प्रकरणे दररोज उघडकीस येतात. पोलीस अधिकारीच दारूची तस्करी करून कायद्याची चेष्टा करू लागल्याने ही बाब अधिक गंभीर बनत चालली आहे.
दारूबंदी लागू करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, तेच पोलीस दारूची तस्करी करू लागले आहेत. नुकतेच सीआयडीमध्ये कार्यरत असलेल्या नीता चौधरी या महिला पोलीस कर्मचाऱ्याला दारू माफियांसोबत तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भचाऊ येथील चोपरवा पुलाजवळील गोल्डन हॉटेलजवळ स्थानिक पोलिसांनी नीता चौधरीला थार कारमध्ये दारूसह पकडले. नीता चौधरी स्वतः मद्यधुंद अवस्थेत होती असाही आरोप आहे. नीता चौधरी तिच्या हायप्रोफाईल जीवनशैलीमुळे सतत चर्चेत असते. (हेही वाचा: Pani Puri Samples Fail to Meet Quality: पाणीपुरी खाण्याचे शौकीन असाल तर व्हा सावध; आढळले कर्करोगास कारणीभूत घटक, FSSAI ने केली होती तपासणी)
नीतासोबत युवराज सिंग असे अटक केलेल्या दारू तस्कराचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता नीता चौधरी व तिच्या साथीदाराने पोलिसांवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसासह पकडलेल्या दारू तस्करावर खुनासारखे 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांकडून देशी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. नीता चौधरी पूर्वीही अनेकदा वादात सापडली आहे. आताची ही कारवाई कच्छ जिल्ह्यातील भचाऊ पोलीस स्टेशन आणि एलसीबी पूर्व यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. कॉन्स्टेबल नीता चौधरी हिला गुजरातचे विद्यमान डीजीपी विकास सहाय यांनी एका प्रकरणात निलंबित केले होते.