Chinese Apps Banned: भारत सरकारने MangoTV, Alipay Cashier, DingTalk, AliExpress यांच्यासह 43 चायनीज अॅप्सवर घातली बंदी; पहा संपूर्ण यादी
याआधी भारताने अनेक चीनी अॅप्सवर (Chinese Apps) कारवाई केली होती, आता भारत सरकारने आणखी 43 मोबाइल अॅप्स बंद करण्याची घोषणा केली आहे.
सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पुन्हा एकदा चीनवर (China) डिजिटल स्ट्राईक केला आहे. याआधी भारताने अनेक चीनी अॅप्सवर (Chinese Apps) कारवाई केली होती, आता भारत सरकारने आणखी 43 मोबाइल अॅप्स बंद करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत भारतात वापरकर्त्यांद्वारे एक्सेस केल्या जाणाऱ्या 43 मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला या अॅप्सबद्दल तक्रारी मिळत होत्या. असे म्हटले जात आहे की या अॅप्समुळे भारताच्या सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन आता सरकारने खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांच्यावर बंदी घातली आहे.
भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर, गृह मंत्रालय कडून प्राप्त झालेल्या विस्तृत अहवालाच्या आधारे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील वापरकर्त्यांना या अॅप्सचा प्रवेश रोखण्याचा आदेश जारी केला आहे. (हेही वाचा: PUBG Mobile India आज लॉन्च होण्याची शक्यता; FAU-G पेक्षा मिळाले अधिक प्री-रजिस्ट्रेशन)
या अॅप्सवर घातली बंदी –
- AliSuppliers Mobile App
- Alibaba Workbench
- AliExpress - Smarter Shopping, Better Living
- Alipay Cashier
- Lalamove India - Delivery App
- Drive with Lalamove India
- Snack Video
- CamCard - Business Card Reader
- CamCard - BCR (Western)
- Soul- Follow the soul to find you
- Chinese Social - Free Online Dating Video App & Chat
- Date in Asia - Dating & Chat For Asian Singles
- We Date-Dating App
- Free dating app- Singol, start your date!
- Adore App
- TrulyChinese - Chinese Dating App
- TrulyAsian - Asian Dating App
- ChinaLove: dating app for Chinese singles
- DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online
- AsianDate: find Asian singles
- FlirtWish: chat with singles
- Guys Only Dating: Gay Chat
- Tubit: Live Streams
- We Work China
- First Love Live- super hot live beauties live online
- Rela - Lesbian Social Network
- Cashier Wallet
- MangoTV
- MGTV- HunanTV official TV APP
- WeTV - TV version
- WeTV - Cdrama, Kdrama&More
- WeTV Lite
- Lucky Live- Live Video Streaming App
- Taobao Live
- DingTalk
- Identity V
- Isoland 2: Ashes of Time
- BoxStar (Early Access)
- Heroes Evolved
- Happy Fish
- Jellipop Match- Decorate your dream island!
- Munchkin Match: magic home building
- Conquista Online II
दरम्यान, याआधी 29 जून रोजी पहिल्यांदाच सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. 15 जून रोजी गलवान चकमकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 27 जुलै रोजी 47 अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. लडाखमध्ये तणाव वाढत असताना आणि चिनी सैन्याने दोनदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारने हे पाऊल उचलले होते. 2 सप्टेंबर रोजी सरकारने पबजीसह 118 अॅप्सवर बंदी घातली. आता आज पुन्हा आता पुन्हा एकदा सरकारने 43 मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे.