Child Porn Videos: धक्कादायक! 220 रुपयांमध्ये टेलिग्रामद्वारे विकले जात आहेत 8,000 चाइल्ड पॉर्न व्हिडिओ; CID ने सुरु केली चौकशी

लेखी तक्रारीच्या आधारे सीआयडीच्या सायबर क्राईम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

झारखंडची राजधानी रांचीमध्ये (Ranchi) पूर्वीपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करी सुरू होती. मात्र आता इथे चाइल्ड पॉर्नोग्राफीचा (Child Porn Videos) बाजारही फोफावू लागला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामच्या माध्यमातून चाइल्ड पॉर्नोग्राफी व्हिडिओ विकले जात असल्याचे बोलले जात आहे. असाच एक प्रकार उघडकीस आल्यानंतर सीआयडीकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. आता गुन्हे अन्वेषण विभागाने झारखंडमध्ये मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कथितपणे विकल्या जात असलेल्या चाइल्ड पॉर्न व्हिडिओंची चौकशी सुरू केली आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

रांची येथील बालहक्क कार्यकर्त्याने हे प्रकरण उजेडात आणले आणि सीआयडीचे महासंचालक आणि सायबर पोलीस स्टेशनला या प्रकरणाशी संबंधित पुरावे सादर केले. यानंतर तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, चाइल्ड पॉर्न व्हिडिओंच्या पुरवठादारांचे नेटवर्क दिल्लीतून कार्यरत होते ज्यासाठी टेलिग्राम अॅपवर बनवलेले ग्रुप्स वापरले जात होते.

झारखंडमधील बालहक्कांसाठी काम करणाऱ्या बाल हक्क फाउंडेशन या संस्थेचे सचिव बैद्यनाथ कुमार यांना माहिती मिळाली होती की, टेलिग्रामवर 'चाइल्ड पॉर्न व्हिडिओ' नावाचा खुला ग्रुप कार्यरत आहे आणि कोणीही त्याचे सदस्य होऊ शकते. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी या टेलिग्राम ग्रुपने कुमार यांना चाइल्ड पॉर्न व्हिडिओ विकत घ्यायचा आहे का? असे विचारले होते. त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर, यूपीआय लिंकद्वारे 220 रुपयांच्या पेमेंटवर असे 8,000 हून अधिक व्हिडिओ उपलब्ध करून दिले जातील असे सांगण्यात आले. यासह एक डेमो व्हिडिओही पाठवण्यात आला. (हेही वाचा: UP Shocker: संभलमध्ये 70 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल)

या लिंकवर पैसे भरल्यानंतर समोरून सहा व्हिडिओ लिंक पाठवण्यात आल्या, त्यानंतर कुमार यांनी झारखंड सीआयडीच्या महासंचालकांकडे याबाबत तक्रार केली. लेखी तक्रारीच्या आधारे सीआयडीच्या सायबर क्राईम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाइल्ड पॉर्न कंटेंट पुरवणारे दोन मोबाईल नंबर ओळखले गेले आहेत, ज्यामध्ये सूर्या नावाचा आरोपी सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) आणि राष्ट्रीय महिला आयोग (NCW) यांनाही पत्र लिहिले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif