Chhota Rajan Tested Covid-19 Positive: तिहार जेलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोना विषाणूची लागण; उपचार सुरु
योग्य तपासणी केल्याशिवाय कोणत्याही बाहेरील व्यक्तीला याठिकाणी जाऊ देत नाहीत. तुरुंगातील काही निवडक कर्मचारीच त्यांना भेटू शकतात.
तिहार तुरुंगामध्ये (Tihar-Jail), बिहारच्या सीवानमधील आरजेडीचे माजी खासदार शहाबुद्दीन यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यानंतर, आता तिहार जेलमध्येच असणारा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनदेखील (Underworld Don Chhota Rajan) कोरोना संसर्गाच्या तावडीत सापडला आहे. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर छोटा राजनच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत व सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्याला तिहारबाहेर कोणत्याही रुग्णालयात पाठविण्याची स्थिती उत्पन्न झाली नाही. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गुरुवारी छोटा राजनचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. यानंतर त्याच्या सेलच्या सुरक्षेत तैनात सुरक्षा कर्मचारी आणि सेलच्या आसपास तैनात तुरूंगातील इतर कर्मचार्यांना विलगीकरनामध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.
छोटा राजन आणि शहाबुद्दीन दोघेही तिहारच्या तुरूंगात दोन नंबरच्या जेलमध्ये कडक सुरक्षा कक्षात, कडक बंदोबस्तात आहेत. योग्य तपासणी केल्याशिवाय कोणत्याही बाहेरील व्यक्तीला याठिकाणी जाऊ देत नाहीत. तुरुंगातील काही निवडक कर्मचारीच त्यांना भेटू शकतात. दोघांनाही भेटणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कोरोना तपासणी प्रक्रियेमधून जावे लागते. आता या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर, तुरूंग क्रमांक दोन आवारात बंदिस्त असलेल्या इतर कैद्यांचीही कोरोना चाचणी केली जात आहे. कैद्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास त्यांना त्वरित इतर कैद्यांपासून दूर केले जात आहे. (हेही वाचा: जाणून घ्या का खासगी रुग्णालयांना 600 रुपयांमध्ये विकली जात आहे Covishield लस; Serum Institute of India ने दिले स्पष्टीकरण)
तिहारच्या एकमेव महिला जेल क्रमांक सहामध्ये कोरोना विषाणू प्रकरणे लक्षणीय वाढली आहेत. तिहार हे असे जेल आहे जिथे साधारण कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त नसते. बहुतेक वेळा येथे कैद्यांची क्षमता कमी असते. इतर तुरूंगांच्या तुलनेत येथे शारीरिक अंतराचे सहज पालन करणे शक्य आहे. अवघ्या 400 कैद्यांची क्षमता असलेल्या या तुरूंगात 43 महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासाठी कारागृह आवारात स्वतंत्र प्रभाग तयार करण्यात आला आहे, जेथे डॉक्टर सर्वांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत.