Chhattisgarh: पुत्रप्राप्तीसाठी अजब प्रथा; पोटावर पडून राहिल्या महिला व त्यांच्या पाठीवर चालत जाऊन पुजाऱ्यांनी केला मंदिरामध्ये प्रवेश (Watch Video)
यासाठी डॉक्टर, वैद्य यांच्यासोबत काही धार्मिक कृत्ये किंवा अंधश्रध्दा असलेल्या गोष्टीही केल्या जातात. आता छत्तीसगडच्या (Chhattisgarh) धमतरी (Dhamtari) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर येत आहे.
मुल नसलेली जोडपी पुत्रप्राप्तीसाठी अनेक उपाय करतात. यासाठी डॉक्टर, वैद्य यांच्यासोबत काही धार्मिक कृत्ये किंवा अंधश्रध्दा असलेल्या गोष्टीही केल्या जातात. आता छत्तीसगडच्या (Chhattisgarh) धमतरी (Dhamtari) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर येत आहे. इथे एका प्रथेनुसार देवी अंगारमोतीच्या (Goddess Angaarmoti) मंदिरामध्ये गर्भधारणेची तीव्र इच्छा असलेल्या शेकडो विवाहित महिला शुक्रवारी जमिनीवर पडून राहिल्या व पुरोहित आणि पुजाऱ्यांनी या महिलांच्या पाठीवर चालत जाऊन मंदिरामध्ये प्रवेश केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. धमतरीमध्ये दिवाळीनंतर दरवर्षी मढाई जत्रेचे (Madhai Fair) आयोजन केले जाते. याच जत्रेमध्ये ही प्रथा अजूनही पाळली जाते.
देवी अंगारमोतीच्या मंदिरात अनेक वर्षांपासून पुत्र प्राप्तीसाठी ही प्रथा पाळली जाते. ज्यामध्ये स्त्रिया आपल्या पोटावर उलट्या पडून राहतात आणि बैगा जमातीचे लोक त्यांच्यावरुन चालत जातात. याला परण असे म्हटले जाते. असे मानले जाते की यामुळे महिलांना मुले होतात. यावर्षीही 52 गावांमधून 200 हून अधिक महिला लिंबू, नारळ व इतर पूजा सामग्रीसह केस मोकळे सोडून पोटावर पडल्या होत्या.
20 नोव्हेंबर रोजी 200 हून अधिक नि: संतान महिला मुल होण्याच्या आशेने देवी अंगारामोतीच्या या जत्रेमध्ये सामील झाल्या होत्या. श्रद्धेनुसार, मड़ई, ध्वज आणि डांग घेऊन चालणाऱ्या 11 लोकांच्या गटासमोर त्या पोटावर पडून राहिल्या आणि हे लोक महिलांच्या पाठीवर चालत जाऊन त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. असे मानले जाते की अशाप्रकारे, स्त्रियांच्या अंगावरून चालत जाण्याने देवीची कृपा होते आणि संतती नसलेल्या महिलांना मुले होतात. या जत्रेला सुमारे 500 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: संपूर्ण लॉकडाऊन आईच्या मृतदेहासोबत घरात एकटीच राहिली महिला; शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर समोर आली ही धक्कादायक घटना)
महत्वाचे म्हणजे सध्याच्या कोरोना विषाणूच्या काळात सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस असूनही, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, स्वच्छता अशा सर्व नियमांची पायमल्ली झाली.
2159609