Court On Breakup and Auicide: प्रेमभंगातून आत्महत्या असल्यास आरोपीवर गुन्हा दाखल करता येणार नाही- हायकोर्ट

तसेच, तिच्यावर गुन्हाही दाखल करता येणार नाही, असे स्पष्ट मत छत्तीसगड हायकोर्टाने (Chhattisgarh High Court) नोंदवले आहे.

Court (Image - Pixabay)

एखाद्या तरुणाने प्रेमभंग (Breakup) झाल्याने आत्महत्या (Suicide) केली असेल तर त्याचा दोष त्याची प्रेयसी असलेल्या तरुणीला अथवा महिलेला देता येणार नाही. तसेच, तिच्यावर गुन्हाही दाखल करता येणार नाही, असे स्पष्ट मत छत्तीसगड हायकोर्टाने (Chhattisgarh High Court) नोंदवले आहे. न्यायमूर्ती पार्थ प्रीतम साहू यांच्या एकल खंडपीठाने एका विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधीत खडल्यात निकाल देताना हे मत नोंदवले. कोर्टाने एक उदाहरण देत म्हटले की, जर एखाद्या परीक्षेत अथवा खटल्यात अपयश आल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर शिक्षक अथवा त्याच्या वकीलाला दोषी धरता येणार नाही. त्याच प्रमाणे सदर खटल्यातही संबंधित तरुणीला दोषी मानता येणार नाही.

न्यायमूर्ती पार्थ प्रीतम साहू यांनी सात डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, एखाद्या दुबळ्या अथवा कमकुवत मनाच्या व्यक्तीने विशिष्ट परिस्थितीमुळे आत्महत्या केल्यास त्याचा दोष इतरांना देता येणार नाही. तसेच, केल्यास ते न्यायालया धरुण होणार नाही. त्यामुळे हे कोर्ट या प्रकरणात 24 वर्षीय महिलेला आणि तिच्या दोन भावांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश देत आहे. या प्रकरणात सदर तरुणी आणि तिच्या भावांविरुद्ध तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा, Assam Government On Second Marriage: राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय दुसरे लग्न करण्यास बंदी- आसाम सरकार )

खटल्याच्या सुनावणीदरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार, तरुणाने त्याच्या राहत्या घरी 32 जानेवारी 2023 मध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी सदर तरुणाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यामध्ये सदर 24 वर्षीय तरुणी (महिला) आणि तिच्या भावांवर आरोप करण्यात आला होता. त्याने लिहीलेल्या दोन पानांच्या चिठ्ठीमध्ये त्याने दावा केला होता की, सदर तरुणीसोबत त्याचे पाठिमागील आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले आणि दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला. त्याने तिच्यावर आणि तिच्या दोन भावांवर धमकावल्याचा आरोप केल होता. सततच्या धमक्यांना कंटाळून आणि घाबरुन आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

एक्स पोस्ट

पीडित तरुणाच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरुन राजनांदगाव पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तिघांनाही अटक करण्यात आली होती. जिल्हा कोर्टाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्याविरोधात तिघांनीही वरच्या कोर्टात दाद मागितली होती. ज्यामध्ये त्यांना आरोपमुक्त करण्यात आले.