Chhattisgarh Accident: भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 10 ठार; छत्तीसगड राज्यातील घटना
या अपघातात एका लहान मुलासह अनेक जण जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) धमतरी जिल्ह्यात (Dhamtari District) बोलेरो गाडी ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका लहान मुलासह अनेक जण जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांकेर राष्ट्रीय महामार्गावर (Kanker National Highway) जगत्राजवळ (Jagatra) बुधवारी सायंकाळी उशिरा ही धडक झाली. हे कुटुंब सोरामहून मरकटोलाकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, बोलेरो गाडीतून हे सर्व कुटुंबीय बालोद येथील पुरूर ते चरमा दरम्यान बालोदगहाणजवळ लग्न समारंभासाठी निघाले होते.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना, जितेंद्र कुमार यादव, एसपी बालोद म्हणाले, "बलोड जिल्ह्यातील जगत्राजवळ ट्रक आणि कारच्या धडकेत 10 जण ठार झाले आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला. जखमींना चांगल्या उपचारांसाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे. कारण ट्रकच्या चालकाची चौकशी आणि अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे.
ट्विट
दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच पुरूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मदत व बचाव कार्य सुरु केले. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि अपघातात जखमी झालेल्या मुली-मुलाच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य. मी जखमी मुलीच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे ट्विट बघेल यांनी केले.