Chhagan Bhujbal on Lok Sabha Election: आढावा सुरु आहे, जागावाटपानंतर उमेदवार निश्चिती- छगन भुजबळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षास जेवढ्या जागा असतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही हव्या आहेत, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आलेले वक्तव्य पाहता महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला जाण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election News: लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर महायुतीमधील घटकपक्षांमध्येही महाविकासआघाडीप्रमाणेच घोळ पाहायला मिळत आहे. घटकपक्ष आपापल्या जागांवर दावा ठेकून कायम राहिल्याने भाजपची कोंडी झाली आहे. परिणामी भाजप नेतृत्व दिल्लीतून महाराष्ट्रात दाखल झाले आहे. जागावाटप करताना प्रत्यके जागेचा अहवाल घेऊन विचार केला जातो आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जागा वाटपावर भाष्य केले आहे. जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. प्रत्येक पक्षाची लढण्याची आणि जिंकण्याची क्षमता पाहून उमेदवार निश्चिती केी जाईल. त्यासाठी मुंबईत खलबतं सुरु आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षास जेवढ्या जागा असतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही हव्या आहेत, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आलेले वक्तव्य पाहता महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला जाण्याची शक्यता आहे.
'देशात 400 पार महारष्ट्रात 45 पेक्षा अधिकचे लक्ष्य'
छगन भुजबळ यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, महायुतीमध्ये आमचे जे तीन पक्षांचे गट आहेत त्यामध्ये कोणत्या जागेवर कोण जिंकेल, कोण चांगले काम करु शकतो, कोणाची निवडून येण्याची क्षमत आहे तो सध्या कोणत्या पक्षात आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जात आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत. भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली कालच बैठक झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले अब की बार 400 पारचे लक्ष्य आणि महाराष्ट्रातील 45 पेक्षाही अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य यावर सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासोबत आमच्या नेत्यांची चर्चा सुरु असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले. (हेही वाचा, Chhagan Bhujbal: मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट)
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्याने भाजपची डोकेदुखी वाढली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वेगवेगळे दावे केले आहेत. त्यामुळे जागावाटपात निर्माण झालेला गुंता काढण्यासाठी भाजप आणि केंद्रीय नेतृत्व प्रयत्न करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महायुतीतील नेत्यांची एक बैठक सुरु असल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील काही महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार)
व्हिडिओ
#WATCH मुंबई: बीजेपी महागठबंधन की बैठक पर एनसीपी नेता छगन भुजबल ने कहा, "हमारी जो तीन गुट हैं उसमें कौन-सी जगह पर कौन लड़ेगा, कौन अच्छे से काम कर सकता है और चुनकर आ सकता है और वो किस पार्टी का है ये सारा जायजा लिया जा रहा है और जल्द-जल्द इस पर फैसला होगा। पीएम मोदी के सपने 400… pic.twitter.com/mBo7nwNEEH
— ANI_HindiNews (@AHindinews) March 6, 2024
दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा आहे की, महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांना अमति शाह यांनी दिल्लीला बोलावले आहे. राज्यातील जागावाटपाचा तिढा दिल्लीतच सोडवला जाणार आहे. त्यामुळे कोणाचे तिकीट कापणार-कोणाची उमेदवारी कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2024 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

