चेन्नई: बायको भांडून माहेरी गेल्याने निराश झालेल्या नवऱ्याने कापले गुप्तांग
मात्र आजकाल या दोघांमधील भांडण एवढे विकोपाला जात आहे की, हत्या करण्यापर्यंत मजल जात आहे.
वैवाहिक जीवनातील नवरा-बायकोचे भांडण प्रत्येक घरात पहायला मिळते. मात्र आजकाल या दोघांमधील भांडण एवढे विकोपाला जात आहे की, हत्या करण्यापर्यंत मजल जात आहे. परंतु चैन्नई येथे नवरा बायकोचे भांडण झाले. त्यानंतर बायको माहेरी निघुन गेल्याच्या कारणास्तव निराश झालेल्या नवऱ्याने चक्क त्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तमिळनाडू येथील ही घटना असून बाबू असे पती आणि देवी असे पत्नीचे नाव आहे. या दोघांच्या विवाहाला काही वर्ष झाले तरीही मुल झाले नसल्याच्या कारणावरुन एकमेकांमध्ये वादाची ठिगणी उडत होती. तसेच बाबू हा नेहमीच दारु पित असल्याचे देवी याचा विरोध करत होती. बाबूच्या याच त्रासाला कंटाळून तिला घटस्फोट हवा होती. पण या दोघांमध्ये एवढे जोरात भांडण झाले की देवी थेट माहेरी निघून गेली. त्यानंतर माहेरी गेलेली देवी पुन्हा नव वर्षाच्या स्वागतासाठी घरी आली. त्यावेळी ही बाबू हा अतिप्रमाणात दारु प्यायल्याने दोघांमध्ये भांडण झाले. या प्रकारानंतर घरी आलेली देवी पुन्हा माहेरी निघून गेली.(PUBG मुळे ओळख झालेल्या गर्भवती तरूणीवर मित्रांकडून कुर्ला, वलसाड मध्ये सामुहिक बलात्कार; अत्याचारामुळे पीडितेचा गर्भपात)